आपला जिल्हानाशिक

सावित्रीबाई फुले इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये रंगणार कलाविष्कार विद्यार्थ्यांच्या परिश्रमांना मिळणार दाद ; २६ फेब्रुवारीकडे सर्वांचे लक्ष

मनिष जाधव 9823752964

यशाच्या क्षणांचा साक्षीदार

सावित्रीबाई फुले इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये रंगणार कलाविष्कार

विद्यार्थ्यांच्या परिश्रमांना मिळणार दाद ; २६ फेब्रुवारीकडे सर्वांचे लक्ष

उंदीरवाडी प्रतिनिधी – येवला तालुक्यातील उंदीरवाडी येथील सवित्रीबाई फुले इंग्लिश मीडियम स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा सोहळा स्कूलचे संस्थापक अध्यक्ष सचिनभाऊ कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे. सदरचा सोहळा दि. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता मोठ्या उत्साहात व विशेष संकल्पनेतून पार पडणार असून स्नेहसंमेलन बाबत विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. सदरचा सोहळा यशस्वीपणे पार पडण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यासाठी विशेष मेहनत घेत आहे. स्कुलचा वार्षिक सोहळा म्हणजे विद्यार्थ्यांच्या प्रतिभेचा रंगतदार उत्सव मानला जातो. सदर कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांनी जोमाने सराव सुरू केला असून शाळा परिसरात सध्या उत्साहाचे वातावरण आहे. विविध कार्यक्रमांची रंगीत तालीम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती स्कूलचे प्राचार्या सौ. वंदना थोरात यांनी दिली.

Fb

वन विभागाचे अधिकारी राहुल घुगे , नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांचे जनसंपर्क अधिकारी बाळासाहेब लोखंडे, शिक्षणाधिकारी संजय कुसाळकर, संस्थेचे उपाध्यक्ष विशाल कळमकर, सचिव अचित कळमकर यांच्यासह आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत तसेच कार्यक्रमाचे विशेष अतिथी प्रसिद्ध गायिका गायत्री साळवे तसेच Zee Talkies फेम संदीप जाधव आदि मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होणार आहे.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रेरणादायी कार्याला अभिवादन म्हणून त्यांच्या नावाने उंदीरवाडी येथे शिक्षण संस्थेची स्थापना करून समाजातील वंचित घटक, मुलींचे शिक्षण आणि गुणवत्तापूर्ण ज्ञानप्रसार हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवूनच संस्थेचे कार्य सुरु आहे.

U

शिक्षण हेच समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन आहे, या विचारावर विश्वास ठेवत संस्था विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करत आहे. आधुनिक शिक्षणपद्धती, संस्कारमूल्ये आणि सामाजिक बांधिलकी यांचा समन्वय साधत विद्यार्थ्यांना सक्षम नागरिक घडविण्याचा संकल्प संस्थेने हाती घेऊन संस्थेने त्या दिशेने पाऊल टाकले आहे.

वार्षिक स्नेहसंमेलन हा केवळ मनोरंजनाचा कार्यक्रम नसून विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाला नवी उभारी देणारा आणि त्यांच्या गुणांना व्यासपीठ मिळवून देणारा सोहळा ठरतो. त्यामुळे उंदीरवाडी परिसरात या भव्य सोहळ्याबाबत दिवसेंदिवस उत्सुकता वाढताना दिसत असून मोठ्या संख्येने उपस्थित राहवे असे आवाहन स्कूलचे प्राचार्या सौ. वंदना थोरात यांनी केले.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!