
संस्कारी माता : कै. मंगलकाकू सोमासे
जगातील सर्वात सुंदर दैवत ते म्हणजे आमची आई, तो आमचा स्वर्गच होता. कै. मंगलकाकू सोमासे, आई घरादाराला पुढे नेई. संसाराच्या सायकलचे दोन्ही चाकच ती चालवत होती. असं आमचं कुटुंब. आमचे कुटुंबीय देखील समाजप्रिय, त्यांना माणसांची फार आवड. नेहमी घरी माणसे आली की, चहा, पाणी, जेवण केल्याशिवाय जाऊ देत नव्हते. या सवयीमुळेच आईनेही तोच वसा पुढे चालविला.

मुले शैलेश , कैलास , अक्षय, मुलगी वंदना व पती सिताराम यांच्या खांद्याला खांदा लावून आईने म्हणजे कै. मंगलकाकू यांनी न डगमगता प्रपंचाचे ओझे उचलले. कोणत्या आईला वाटते की, आपल्या मुलाने काबाड कष्ट करावे, संघर्षमय जीवन जगावे, लोकांच्या बांधावर उभे राहून ऊसतोडण्या कराव्यात किंवा सरकारी अधिकाऱ्यांच्या हाताखाली राह्न गुलामी करावी? असलं – जगणं पाहून एखाद्या माय माऊलीच्या काळजाचे पाणी पाणी होऊन जाईल. माझी आई देखील यापेक्षा वेगळी नव्हती.
कारण, ती ज्या कुटुंबातून आली होती. ते फार संस्कारी व सुशिक्षित कुटुंब होते. स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी या वाक्याचा खरा अर्थ आईच आज आमच्यात नसणं तेव्हा कळाला. आज आमच्याकडे सर्व काही आहे पण आमची आई नसल्याने निश्चितच आमच्या संसारातील साखरेची गोडी नष्ट झाली. आयुष्यात आपण कितीही शिकलो, पैसा आणि नाव कितीही कमविलं परंतु आईवडिल, गुरु यांच्या आशिर्वादाशिवाय, असण्याशिवाय सर्व काही व्यर्थ असतं. आई शिक्षित असो किंवा अशिक्षित… जेव्हा आपण जीवनात अपयशी होतो तेव्हा तिच्यासारखा मार्गदर्शक या पृथ्वीवर आम्हांला शोधूनही सापडणार नाही. आईची शेवटची शिकवण अजुनही आम्हाला आठवते. आपल्या मातीला प्रेम देणाऱ्या माणसांना कधीही विसरू नका. कोणी आपल्या सोबत कसेही वागले तरी चालेल. मात्र, आपण आपले संस्कार विसरायचे नाही. खरतर आमच्या आईने आम्हाला फार कष्टातून घडविले आहे. त्यामुळे, तिच्या संस्काराला आणि विचारांना तडा जाईल असे आम्ही कधी वागलो नाही.

आज आई नाही म्हणून फार पोरके वाटत आहे. मात्र, आई जाऊन एक वर्षे झाले. ही कल्पना देखील मानला भिडत नाही. अजुनही तिच्या अस्तित्वाचा आभास या अंगनात मला होतो आणि तिच्या आवाजाचा भासही..! आई देवाघरी गेली तरी तिच्या अनंत आठवणी माझ्या मनात शेवटच्या श्वासापर्यंत कायम
राहतील..!……

आमच्या मातोश्रीच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी आणि त्यांच्या आयुष्याचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवण्यासाठी आम्ही दिनांक २० सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १२.०० वाजता लोणार मंगल कार्यालय, टाकळी-खडकी रोड, कोपरगाव येथे प्रथम पुण्यस्मरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.या वेळी रामायणाचार्य ह.भ.प. सुवर्णमाई जमधडे(अध्यक्ष – ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्था, वडगाव बल्हे, ता. येवला, जि. नाशिक) यांचे प्रवचन होणार असून, त्यातून उपस्थितांना अध्यात्मिक समाधान आणि ज्ञानमृताचा लाभ मिळणार आहे. आपल्या उपस्थितीने हा सोहळा अधिक मंगलमय होईल, अशी आमची नम्र विनंती आहे.”
🙏 आपले विनंतीकार
श्री. शैलेश सिताराम सोमासे (मुलगा)
श्री. कैलास सिताराम सोमासे (मुलगा)
चि. अक्षय सिताराम सोमासे (मुलगा)
सौ. वंदना सुरेश लाड (मुलगी)
समस्त सोमासे परिवार
📍 कार्यक्रम स्थळ : लोणार मंगल कार्यालय, टाकळी-खडकी रोड, कोपरगाव