संवत्सरमध्ये श्री संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी सोहळा
कोपरगाव प्रतिनीधी-: कोपरगाव तालुक्यातील पुर्व भागातील संवत्सर मधील नवुचारी येथील महाराष्ट्र माळी समाज महासंघ कोपरगाव तालुकाध्यक्ष श्री.अनिल हरीभाऊ सोनवणे व सावता महाराज प्रेमी मंडळींच्या प्रयत्नाने श्री संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी सोहळा दि.२३ जुलै वार बुधवार रोजी सकाळी १० वाजता साजरा करण्यात येणार आहे.
या सोहळ्या निमित्ताने ह.भ.प.वाल्मिक महाराज जाधव यांचे जाहीर प्रवचनाचा कार्यक्रम होनार आहे.तरी ज्ञानामृत श्रवणाचा व महाप्रसाद जास्तीत-जास्त भाविकांनी लाभ घ्यावा,असे आवाहन श्री संत शिरोमणी सावता माळी महाराज मंडळ,परीवार व अखिल भारतीय श्री संत सावता माळी युवक संघ जिल्हाध्यक्ष मुकुंद मामा काळे यांनी केले आहे.