आपला जिल्हा

संजीवनी कॉलेज ला होणार फार्मसी डे साजरा कोपरगाव तालुक्यातील आरोग्य दूतांचा होणार सन्मान

मनिष जाधव 9823752964

Logo
Oplus_16908288

संजीवनी कॉलेज ला होणार फार्मसी डे साजरा

कोपरगाव तालुक्यातील आरोग्य दूतांचा होणार सन्मान

कोपरगाव मनिष जाधव – शिक्षणातून रोजगार, स्वयंरोजगार, उद्योजक निर्माण होण्यासाठी कार्यरत असणाऱ्या उच्च गुणवत्तेच्या शिक्षण व्यवस्थापन संस्थांमध्ये संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे नाव देशात अग्रेसर आहे. आधुनिकतेची कास धरीत प्रशिक्षित कौशल्याधिष्ठित युवा मनुष्यबळ तयार करीत राष्ट्रउभारणीचे काम ‘संजीवनी’च्या माध्यमातून गेले अनेक वर्षांपासून सुरू आहे. या संस्थेचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे साहेब, संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमितदादा कोल्हे यांच्या कठोर परिश्रमामुळे ही संस्था जागतिक स्तरावरील शिक्षणाची केंद्र बनली आहे. अशा या नावलौकिक संस्थेचे वतीने फार्मसी डे निमित्ताने कोपरगाव तालुक्यात आरोग्य सेवेत तसेच समाजासाठी केलेल्या मेहनतीची, योगदानाची दखल घेत श्री दिगंबर शिवराम गुरसळ (शांती मेडिकल, चांदेकसारे) यांना जीवनगौरव पुरस्कार तर श्री अनुप अरुण डागा ( सिटीकेअर मेडिकल, कोपरगाव ) बेस्ट फर्मासिस्ट पुरस्कार जाहीर झाला असून औषधे सेवेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या केमिस्ट बंधू भगिनींना आदर्श सेवा पुरस्कार जाहीर झाला असून त्यांची नावे पुढीलप्रमाणे.

ऊ
दिगंबर शिवराम गुरसळ
अनुप अरुण डागा
दत्तात्रय चव्हण
अमोल भुतडा
सोनाली जामदार
रविंद्र औताडे
सचिन सावंत
आकाश वडागळे
राहुल कहार

श्री राहुल अशोक कहार ( समर्थ मेडिकल, वारी ), श्री दत्तात्रय सुभाष चव्हाण, (वैरागीनाथ मेडिकल, शिंगणापूर), श्री अमोल चंपालाल भुतडा (यशोदीप मेडिकल स्टोअर, येसगाव) , सौं. सोनाली विकास जामदार (साई मेडिकल स्टोअर चासनळी ), श्री. रविंद्र एकनाथ औताडे ( श्रीराम मेडिकल स्टोअर,पोहेगाव ) श्री सचिन दत्तात्रय सावंत ( सचिन मेडिकल स्टोअर,
कोपरगाव ) , श्री आकाश अंबादास वडांगळे (साई वरद मेडिकल स्टोअर, कोपरागाव) यांना आदर्श सेवा पुरस्कार जाहीर झाला असून यांचा सन्मान मंगळवार दिनांक २३ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिल चे अध्यक्ष श्री अतुल भाऊ आहिरे, आदरणीय सहाय्यक आयुक्त अन्न व औषधं प्रशासन श्री अशोकजी बर्डे साहेब व औषधं निरीक्षक श्री सोमनाथ जी मुळे साहेब, संस्थेचे अध्यक्ष नितीन दादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमितदादा कोल्हे, कोपरगाव तालुका केमिस्ट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, सदस्य यांच्यासह प्रमुख उपस्थितीत सर्व पुरस्कार मानकरी याच पुरस्कार मानकरींचा सन्मान होणार असून सर्वच स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Check Also
Close
Back to top button
Don`t copy text!