संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कूल चे दोन खेळाडू यांची महाराष्ट्र राज्य संघात निवड!!
कोपरगाव प्रतिनिधी मनिष जाधव – कोपरगांव येथील नामांकित असलेल्या संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कूल मधील अनुक्रमे प्रतीक बापु फुलारे व सार्थक किशोर कुलकर्णी यांची क्रिकेट व चोक बॉल खेळात राज्य संघात निवड झाल्याने सदर शाळेचे सर्वत्र कौतुक होत आहे!

आदरणीय दिवंगत माजी मंत्री शंकरराव कोल्हे साहेब यांनी सूरू केलेल्या ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार इंग्लीश शिक्षण मिळावे या उद्देशाने सूरू केलेल्या सदर शाळेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

जिद्द व चिकाटी आणि मेहनत घेत विदयार्थी चांगले प्रगती करीत आहे. या दोनही खेळाडूंचे संजीवनी उद्योग समुह अध्यक्ष आदरणीय बिपीन दादा कोल्हे, प्रथम महीला आमदार सौ. स्नेहलता ताई कोल्हे.. संस्था अध्यक्ष युवा नेते विवेक भैय्या कोल्हे साहेब..मॅनेजिंग ट्रस्टी सौ.रेणुका ताई विवेक भैय्या कोल्हे,मुख्याध्यापक मोहसिन शेख,शाळेचे क्रीडा मार्गदर्शक अनुप गिरमे व सर्व शिक्षक वृंद,शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, सर्व विद्यार्थी,पालक व पंचक्रोशीतील नागरिक यांनी कौतुक केले आहे.