संजिवनी इंग्लिश मिडीयम स्कूलची विद्यार्थीनी वृंदा योगेश गांगुर्डे हिचे राज्यस्तरीय स्पर्धेत सुयश
कोपरगाव प्रतिनिधी मनिष जाधव –माजी मंत्री दिवंगत शंकरराव कोल्हे साहेब यांच्या स्वप्नातून साकारलेल्या संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कूल या शाळेतील इयत्ता 9 वी ची विद्यार्थीनी कुमारी वृंदा योगेश गांगुर्डे हिने दिनांक 21 व 22 जुलै 2024 रोजी झालेल्या राज्यस्तरीय सिलंबम क्रीडा स्पर्धेत सुयश मिळवले आहे.
सदर स्पर्धा पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे आयोजित केली होती त्यात तिने सिल्व्हर मेडल प्राप्त करुन शाळेचे नावं उज्वल केले आहे. या कामगिरी बद्दल तिचे शाळेचे प्राचार्य. मोहसिन शेख सर यांनी मेडल प्रदान करुन गौरव केला आहे. वृंदा हिच्या यशा बद्दल तिचे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष आदरणीय बिपिन दादा कोल्हे साहेब, प्रथम महिला आमदार आदरणीय सौ. स्नेहलता ताई कोल्हे..शाळेचे अध्यक्ष आदरणीय युवा नेते विवेक भैय्या कोल्हे साहेब.. शाळेच्या मॅनेजिंग ट्रस्टी आदरणीय सौ. रेणुका ताई कोल्हे , सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विदयार्थी तसेच पंचक्रोशीतील सर्वांनी अभिनंदन केले आहे.. तिला सिलंबम संघटना अध्यक्ष. डॉ. झिया शेख.. तसेच शाळेचे क्रीडा प्रशिक्षक अनुप गिरमे यांचे मार्गदर्शन लाभले आहे