Uncategorized

श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठेनिमित्त संजीवनी युवा प्रतिष्ठानतर्फे भाविकांना प्रसाद वाटप   

संपादक मनिष जाधव 9823752964

श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठेनिमित्त संजीवनी युवा प्रतिष्ठानतर्फे भाविकांना प्रसाद वाटप
कोपरगाव मनिष जाधव – अयोध्येतील श्रीराम मंदिर उद्घाटन व रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त कोपरगाव येथे संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी स्वत:च्या हाताने बुंदी प्रसाद तयार करून श्रीराम चरणी सेवा अर्पण केली. या प्रसादाचे माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे, युवा नेते विवेकभैय्या कोल्हे, संजीवनी स्वयंसहाय्यता महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुकाताई कोल्हे यांच्या हस्ते भाविकांना वाटप करण्यात आले.
ए
विविध सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांमध्ये कोल्हे परिवार नेहमीच सहभागी होत असतो. समाजसेवा करण्याच्या उद्देशाने युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी संजीवनी युवा प्रतिष्ठानची नऊ वर्षांपूर्वी स्थापना केलेली असून, नि:स्वार्थीपणे काम करणाऱ्या संजीवनी युवा प्रतिष्ठानने युवकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. प्रतिष्ठानने विवेकभैय्या कोल्हे यांच्या संकल्पनेतून गेल्या नऊ वर्षांत सामाजिक, धार्मिक, कृषी, आरोग्य, क्रीडा, सांस्कृतिक आदी क्षेत्रात अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. संकटकाळी नागरिकांच्या मदतीला धावून जाणारे संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवा सेवक सामाजिक कार्याबरोबरच धार्मिक कार्यातही नेहमीच हिरीरीने सहभागी होत असतात. कोणतेही सामाजिक, धार्मिक कार्य असो, त्यामध्ये युवा नेते विवेकभैय्या कोल्हे तन-मन-धनाने सेवा देत असतात. आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून ते धार्मिक कार्यक्रमात सहभागी होत असतात. महाप्रसाद तयार करण्यासाठी मदत करण्याबरोबरच पंगतीत भाविकांना महाप्रसाद वाटप करताना ते अनेकदा दिसून येतात. विवेकभैय्या कोल्हे यांच्या या सेवाकार्याचे अयोध्येतील श्रीरामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा दर्शन घडले.
संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या श्रीराम जन्मभूमी अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिराचे उद्घाटन व श्रीरामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा सोमवारी (२२ जानेवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सोमवारी कोपरगावात संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने प्रभू श्रीरामाला वंदन करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्ताने सायंकाळी झालेल्या गंगा गोदावरी महाआरतीप्रसंगी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने सर्व भाविकांना स्नेहलताताई कोल्हे, विवेकभैय्या कोल्हे, रेणुकाताई कोल्हे यांच्या हस्ते बुंदी प्रसाद वाटप करण्यात आला. अनेक भाविकांनी या प्रसादाचा लाभ घेतला. हा प्रसाद तयार करण्यासाठी युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी स्वत: आपली सेवा दिली. त्यांनी स्वत:च्या हाताने बुंदी पाडली आणि प्रसाद तयार करण्यासाठी युवा सेवकांना मदत केली.
श्री रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने विवेकभैय्या कोल्हे यांच्या संकल्पनेतून भाविकांना बुंदी प्रसाद वाटपाचा जो उपक्रम राबविण्यात आला, त्याबद्दल नागरिकांनी विवेकभैय्या कोल्हे व संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या सर्व युवा सेवकांचे कौतुक केले
मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!