शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरेंना मोठा धक्का
जनसंजीवनी वृत्तसेवा – शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगाने दिले आहे. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जात आहे.
निवडणूक आयोगाने शिवसेनेची सध्याची घटना लोकशाहीविरोधी असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. निवडणूक आयोगाने आज उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना घेऊन शिवसेना पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर शिवसेना पक्षावर आणि चिन्हावर त्यांनी दावा केला होता. निवडणूक आयोगासमोर याची लढाई सुरु होती. आज निवडणूक आयोगाने याबाबतचा निर्णय दिला आहे. यात उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव देखील मिळाले आहे. त्यामुळे ठाकरे कुटुंबाकडून शिवसेना निसटली आहे.