शिर्डीत पूजनीय पं. प्रदीपजी मिश्रा यांचे मंगलमय स्वागत !
साईनगरी ‘हर हर महादेव’च्या जयघोषान दुमदुमली
शिर्डी दि.११ प्रतिनिधी – प्रसिद्ध शिवमहापुराण कथाकार पूजनीय पं. प्रदीपजी मिश्रा यांचे साईनगरीत भव्य स्वागत करण्यात आले. लक्ष्मीनगर चौक ते बसस्थानका पर्यतच्या सर्व मार्गावर फुलांची उधळण करीत भगव्या मंगलमय हर हर महादेवचा जयघोषाने शिर्डी नगरी दुमदूमून गेली.

पंडीत प्रदीप मिश्रा महाराजांचे शिर्डीत साडेचार वाजता आगमन झाले.डॉ सुजय विखे पाटील यांनी त्यांच्या गाडीचे सारथ्य केले.पूर्ण मार्ग भगव्या झेंड्यांनी, फुलांच्या तोरणांनी सजविण्यात आला होता महीलांनी डोक्यावर कलश घेवून महाराजांच्या स्वागत सोहळ्यात उपस्थिती दाखवली. संपूर्ण परिसर भक्तिभावाने उजळून निघाला आहे.
स्वागत सोहळ्यात वारकरी दिंडी, झांज पथक, ढोल पथक, तसेच महिलांकडून फुलांची आरती आणि पारंपरिक स्वागत करण्यात आले. महिला मंडळांनी विशेष लाईनमध्ये उभे राहून महाराजांवर पुष्पवृष्टी केली.

यावेळी शेकडो भाविकांनी “हर हर महादेव”च्या जयघोषात महाराजांचे स्वागत करत वातावरण दुमदुमविले. लक्ष्मीनगर चौक ते बसस्थानक परिसरात आयोजित स्वागत मिरवणुकीत महिला, युवक व नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतले.
पूजनीय पं. प्रदीपजी मिश्रा यांचे विमानतळावर पालकमंत्री सुजय विखे पाटील यांच्या खासदार सुजय विखे पाटील यांच्यातर्फ़े स्वागत करण्यात आले.
शिर्डी विमानतळावर पोहोचताच खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी स्वतः कार चालवत महाराजांना विमानतळावरून स्वागतस्थळी आणले.या प्रसंगी नागरिकांनी जोरदार घोषणांनी महाराजांचे स्वागत केले.
राहाता शहरातही भाविकांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून महाराजांचे स्वागत केले.मोठ्या प्रमाणत पुष्पवृष्टी करण्यात आली.शहरातील चौकात भव्य हार घालून शहरवासीयांनी त्यांचे स्वागत केले.मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.राहाता ते लोणी या मार्गावरून युवकांनी दुचाकी वाहनांची रॅली काढून महाराजांचे उत्स्फूर्त स्वागत केले.
या स्वागताच्या कार्यक्रमात स्थानिक कार्यकर्ते, महिला मंडळे, युवक संघटना व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिर्डीत महाराजांच्या प्रवचनासाठी भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित असून, शहर भक्तिभावाने सज्ज झाले आहे.