आपला जिल्हा

विशेष तिकिट तपासणी मोहीम 521 प्रवाशाकडून दोन लाख रुपयांची दंड वसूल 

संपादक मनिष जाधव 9823752964

विशेष तिकिट तपासणी मोहीम
521 प्रवाशाकडून दोन लाख रुपयांची दंड वसूल 
सोलापूर प्रतिनिधी – मध्य रेल्वे सोलापुर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री. नीरज कुमार दोहारे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक श्री.योगेश पाटील, विभागीय सुरक्षा आयुक्त (आरपीएफ) श्री.आदित्य आणि सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक श्रीमती कल्पना बनसोडे यांच्या संयुक्त देखरेखी खाली सोलापूर रेल्वे विभागात दिनांक 11 मे 2024 रोजी विशेष तिकिट तपासणी मोहीम घेण्यात आली. 
रेल्वे
विशेष तिकीट तपासणीची हि मोहीम सोलापूर रेल्वे विभागातील वाडी, कलबुर्गी, सोलापूर, कुर्डुवाडी, लातूर, पंढरपूर या रेल्वे स्थानकांवर तर वाडी-सोलापूर-दौंड आणि मिरज-कुर्डुवाडी-लातूर सेक्शन येथे  धावत्या ट्रेन मध्ये एकूण 72 तिकीट तपासणी कर्मचारी आणि आरपीएफ कर्मचारी यांनी संयुक्तरित्या ही मोहीम पार पाडली. विनातिकीट व अनियमित प्रवास करणारे प्रवासी आणि बुक न केलेले (Unbook luggage)  सामान यांचे एकूण 521 प्रवाश्यांकडून 2.54  लाख रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला. 11 अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली.
Adds
त्रास मुक्त सेवा आणि सुविधा देण्यासाठी रेल्वेने सतत प्रयत्नशील असताना UTS मोबाइल अँप उपलब्ध करून दिले आहे .ज्यामध्ये प्रवासी पेपरलेस प्रवासाची तिकिटे, सीझन तिकीट आणि प्लॅटफॉर्म तिकीट UTS मोबाइल अँप्लिकेशन द्वारे बुक करू शकतात आणि तिकीट मोबाइल अॅप्लिकेशनमध्येच वितरित केले जाईल जे की Android आणि IOS प्लॅटफॉर्म वर लब्ध आहे. तिकिटाची हार्ड कॉपी न घेता प्रवासी प्रवास करू शकतात. जेव्हा जेव्हा तिकीट तपासणारा कर्मचारी तिकीट मागितले तेव्हा प्रवाशांनी अँप मधील  ‘शो तिकीट’ पर्याय वापरावा. सर्व प्रवासी नागरिकांना नम्र विनंती आहे कि त्‍यांनी रेल्‍वे प्रवास करताना, उचित तिकीट घेऊनच रेल्‍वे प्रवास करावा असे आवाहन वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक श्री.योगेश पाटील  यांनी केले.
झ
मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!