आपला जिल्हानाशिकनिवडणुक

विधानसभा निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाला गन्ना किसान हे निवडणुक चिन्ह – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मनिष जाधव 9823752964

आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाला गन्ना किसान हे निवडणुक चिन्ह – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मित्रपक्षांच्या चिन्हावर रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी निवडणूक लढू नये

मुंबई दि. १- येत्या एप्रिल मे महिन्यात आसाम, पाँडेचेरी, केरळ, तामिळनाडु, आणि पश्चिम बंगाल या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक यंदाच्या वर्षी होत आहेत.या आगामी पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी भारत निवडणुक आयोगाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) पक्षाला गन्ना किसान ( ऊस शेतकरी) हे निवडणुक चिन्ह दिले असल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी दिली.

आठवले

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) हा पक्ष नोंदणीकृत असल्याने निवडणुका लढणे हे आम्हाला क्रमप्राप्त आहे. त्यामुळे आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष गन्ना किसान ( ऊस शेतकरी) या निवडणुक चिन्हावर आपले उमेदवार निवडणुकीत उतरवणार आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत एनडीएचा घटक पक्ष म्हणून भाजपला रिपब्लिकन पक्षाचे समर्थन राहणार आहे. मात्र काही जागांवर रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार गन्ना किसान या निवडणुक चिन्हांवर निवडणुक लढतील अशी माहिती ना. रामदास आठवले यांनी दिली आहे.

महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या नगरपरिषदा, नगरपालिका, सर्व स्थानिक स्वराज्यांच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे 80 पेक्षा जास्त उमेदवार राज्यात निवडुन आलेले आहेत. मात्र रिपब्लिकन पक्षाचे कुठेही नाव या निकालांमध्ये दिसले नाही. त्याचे कारण असे आहे की, रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मित्रपक्षांच्या निवडणुक चिन्हांवर निवडणुक लढविल्याने, निवडणुक निकालामध्ये रिपब्लिकन पक्षाचे नांव आढळुन आले नाही. महाराष्ट्रात अनेक स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते मित्रपक्षाच्या निवडणूक चिन्हांवर निवडुन आलेले आहेत. पुढील काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या आणि विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष हा मित्र पक्षाला पाठिंबा निश्चित देईल. मात्र मित्र पक्षाशी युती करुन निवडणुका लढतांना मित्रपक्षाचे निवडणुक चिन्ह रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी वापरु नये, असा रिपब्लिकन पक्षाचा निर्णय आहे.

मी स्वत लोकसभेच्या 3 निवडणुका लढलो. तीन्ही निवडणुका हया कॉग्रेस, राष्ट्रवादीसोबत युती करुन लढलो. मात्र त्या तीनही निवडणुकामध्ये मी कॉग्रेस किवा राष्ट्रवादी कॉग्रेस मित्र पक्षाचे निवडणुक चिन्ह कधीच वापरले नव्हते. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्यांनी मित्र पक्षांशी युती करुन निवडणुका लढतांना मित्र पक्षाचे निवडणुक चिन्ह वापरु नये, रिपब्लिकन पक्षाच्या अस्तित्वासाठी रिपब्लिकन पक्षाच्याच गन्ना किसान या चिन्हांवर निवडणुक लढली पाहिजे. रिपब्लिकन पक्षाच्या निवडणुक चिन्हांवरच रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी निवडणुक लढावी हाच रिपब्लिकन पक्षाचा निर्णय असल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. रामदास आठवले यांनी दिली.

स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये यापूर्वी भारतीय दलित पँथरच्या काळात अनेक ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचे नगरसेवक निवडुन येत होते. नुकतीच पुर्णा शहराला भेट दिली. त्या शहरात भारतीय दलित पँथरचे 7 नगरसेवक निवडुन येत होते. नंतरच्या काळातही रिपब्लिकन पक्षाचेही नगरसेवक निवडुन येत होते. मात्र जेव्हापासुन राज्यात प्रभाग पध्दतीने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होवु लागल्या तेव्हापासुन रिपब्लिकन पक्षा सारख्या छोटया पक्षांचे नगरसेवक स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडुन येणे कठीण झालेले आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रभाग पध्दतीने येणारी निवडणुक ही छोटया पक्षांवर अन्याय करणारी पध्दत आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रभाग पध्दतीने निवडणुक ही तात्काळ रद्द झाली पाहिजे. या मागणीसाठी आपण लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये यापूढे प्रभाग पध्दतीने निवडणुक घेणे बंद केले पाहिजे अशी रिपब्लिकन पक्षाची आग्रही मागणी असल्याची माहिती ना.रामदास आठवले यांनी दिली आहे.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!