विकासाचा उज्ज्वल दीप, संदीप – हीच संदीप पगारेंची ओळख” — संदीप पगारे पुन्हा उमेदवारीस सज्ज!
कोपरगाव प्रतिनिधी मनिष जाधव – कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, प्रभाग क्रमांक ९ मध्ये विद्यमान नगरसेवक संदीप पगारे यांच्या उमेदवारीची अधिकृत चर्चा रंगू लागली आहे. आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा नागरिकांचा विश्वास जिंकण्यासाठी आणि प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी ते मैदानात उतरणार आहेत.

गेल्या कार्यकाळात नगरसेवक म्हणून त्यांनी प्रभागातील अनेक महत्त्वाची विकासकामे पूर्ण केली आहेत. रस्त्यांचे काँक्रीटीकरण, स्वच्छतेची व्यवस्था, पाणीपुरवठा सुधारणा, तसेच नागरिकांच्या दैनंदिन अडचणींचे तात्काळ निराकरण — या सर्व क्षेत्रात त्यांनी सातत्याने काम करून एक विश्वासार्ह प्रतिमा निर्माण केली आहे.
पगारे यांनी नेहमीच “निवडणूक संपली म्हणजे काम थांबत नाही, तर खरी जबाबदारी तेव्हाच सुरू होते” या तत्वावर काम केले आहे. नागरिकांशी थेट संपर्क ठेवत त्यांनी प्रत्येक समस्या व्यक्तिगत जबाबदारीने सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. याच भूमिकेमुळे प्रभागातील जनतेत त्यांच्याबद्दल आत्मीयता आणि विश्वास निर्माण झाला आहे.
आमदार आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली शहरासह तालुक्यात ज्या वेगाने विकासाची गती वाढली आहे, त्याच दिशेने प्रभागात पगारे यांनीही सातत्य ठेवले आहे. “आमदार आशुतोष काळे यांची विचारसरणी विकास केंद्री आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक ९ हा आदर्श प्रभाग बनवण्याचे माझे ध्येय आहे,” असे पगारे यांनी सांगितले.
त्यांच्या कार्यशैलीत नम्रता, जबाबदारी आणि पारदर्शकता हे गुण ठळकपणे दिसून येतात. सामाजिक, शैक्षणिक, तसेच आरोग्यविषयक उपक्रमांतही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. विशेष म्हणजे, प्रभागातील युवकांपासुन ते ज्येष्ठांपर्यंत परिचय हा फायदेशीर ठरणार आहे.
“जनतेच्या सेवेसाठी पुन्हा एक संधी मिळावी, हीच माझी मनापासूनची इच्छा आहे. नागरिकांनी दाखविलेला विश्वास कायम राखून, विकासाच्या वाटचालीत प्रभाग क्रमांक ९ ला आदर्श नगर बनविण्याचा प्रयत्न मी पुढेही करत राहीन,” असे संदीप पगारे यांनी सांगितले आहे त्यांच्या या भूमिकेमुळे प्रभाग क्रमांक ९ मधील निवडणुकीची लढत अधिकच उत्सुकतेची बनली आहे. नागरिकांमध्ये “विकासाचा उज्ज्वल दीप, संदीप” अशी चर्चा सुरू असून, पगारे पुन्हा एकदा जनतेच्या विश्वासाचा पर्याय ठरत आहेत.













