वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या..?
श्रीगोंदा प्रतिनिधी :- श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस स्टेशमध्ये सह्यायक पोलीस उपनिरीक्षक सुनिल धोंडीबा मोरे वय वर्ष 54 यांनी त्यांच्या राहत्या घरी लक्ष्मीनगर येथे लोखंडी जिण्याला साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. माञ, नातेवाईकांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून यांनी जीवनयात्रा संपवली असल्याचा आरोप केला जात आहे.
याबाबत साविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील बेलवंडी पोलीस ठाण्यात सह्यायक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेले सुनिल धोंडीबा मोरे वय 54 हे मागील 3 महिन्यांपासून वैद्यकीय कारणासाठी रजेवर गेले होते. माञ, त्यांच्या नातेवाईकांनी माद्यमांशी बोलताना सांगितले की, बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आणि मयत मोरे यांच्यात तीन महिन्यांपूर्वीच मोठा वाद झाला होता. त्यामूळे सुनिल मोरे हे तीन महिन्यापासून रजेवर होते.परंतु, मागील तीन ते चार दिवसांपुर्वी पोलीस निरीक्षक यांनी त्यांना बोलाऊन घेउन त्यांच्याकडील असलेले गुन्हे पोलीस ठाण्यात जमा करून घेतले.यावेळी त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती. तेंव्हा पासुन ते मानसीक तणावात असल्याचे जाणवत होते असे त्यातूनच आज दिनांक 5 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 9:30 च्या सुमारास दसरा असल्यामुळे घरच्यांना पूजेसाठी फुलं आणि सोनं आनण्यासाठी बाजारात गेल्या नंतर त्यांनी घरातील साडीने लोखंडी जिन्याच्या अँगलला साडी बांधून गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली आहे.याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला मयताचे चुलत भाऊ बाळासाहेब गणपत मोरे यांनी खबर दिली असून, त्यानूसार आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक महेश जानकर हे करीत आहेत.
बेलवंडी पोलीस ठाण्यात अनेक कर्मचारी दुखावलेले !
श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस ठाण्यात नियुक्तीसाठी असलेले कर्मचारी आणि अधिकारी हे पोलीस निरीक्षक यांच्या जाचाला मोठ्या प्रमाणात कंटाळलेले असून आज पर्यंत या पोलीस निरीक्षकाकडून सर्वच कर्मचाऱ्यांचे डिफॉल्ट पाठवले गेल्याची माहिती मिळत आहे त्यामुळे पोलीस निरीक्षकांच्या जाचाला सर्वच कर्मचारी कंटाळले आहेत असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही त्यामुळे याबाबत पोलिस अधीक्षक यांनी तात्काळ कारवाई करणे गरजेचे आहे.