राहुरी तालुक्याला लाभलेलं एक अभ्यासू तरुण नेतृत्व म्हणजे आमदार प्राजक दादा तनपुरे!!
राहुरी प्रतिनिधी अक्षय करपे राहुरी तालुक्यातील जनतेला एक अभ्यासू तरुण तडफदार नेतृत्व मिळाल्याने राहुरी पाथर्डी मतदारसंघाचा विकास कमी कालावधीमध्ये आमदार प्राजक दादा तनपुरे यांनी मोठ्या प्रमाणात केला आहे. सबका साथ सबका विकास हे मूलमंत्र घेऊन अल्पावधीत प्राजक्त दादा यांनी आपल्या नेतृत्वाची छाप पाडली आहे. एक उत्कृष्ट कामगिरी करत विकासाबरोबर सर्वसामान्य जनतेची ही मने आमदार तनपुरे यांनी जिकली आहे. अनेक वर्षानंतर राहुरी पाथर्डी मतदारसंघाला एक तरुण व महत्त्वाचे म्हणजे अभ्यासू लोकप्रतिनिधी मिळाला आहे. राजकारणामध्ये आमदार प्राजक दादा यांनी प्रसिद्धी या पलीकडे सर्वसामान्य लोकांना आपल्या मनामध्ये स्थान दिल्याने नागरिकांनाही जसा आपल्याला हवा तसा लोकप्रतिनिधी मिळाला आहे.
राहुरी पाथर्डी विधानसभा मतदारसंघात प्रथमच लोकनियुक्त नगराध्यक्ष आमदार मंत्री असा प्रवास करणारा एकमेव नेता म्हणजे आमदार प्राजक्त दादा तनपुरे!! आमदार तनपुरे यांनी नेहमीच विकासाला प्राधान्य दिल्याने जनतेनेही प्राजक दादांना आपला हक्काचा लोकप्रतिनिधी मानले आहे. राहुरी पाथर्डी विधानसभा मतदारसंघांमध्ये अत्यंत कमी वेळेमध्ये दिवसांमध्ये दादांनी आपल्या विधानसभा मतदार संघांतर्गत कामे तर केलीच आहे. मात्र या पलीकडेही आपल्या मतदारसंघ बाहेरही मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहे. त्यामुळे आता आगामी काळामध्ये ही राहुरी पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील जनता आमदार प्राजक दादा बरोबर राहणार हे आता स्पष्ट आहे. कारण की राहुरी पाथर्डी विधानसभा मतदारसंघाला एक सशक्त अभ्यासू आणि सर्वसामान्यांची जाण असणारा लोकप्रतिनिधी मिळाला आहे.