राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे विधी (कायदा) शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण
अभियांत्रिकी पदवीधर (बी ई सिव्हील ) असलेले संदीप वर्पे हे राजकारणातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून कोपरगावकराना परिचित असून, ते नुकतीच सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे या विद्यापीठाची विधी शाखेची परीक्षा उच्च द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. कोपरगाव येथील नामदेवराव परजणे पाटील लाँ कॉलेज चे ते विद्यार्थी होते. रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व कोपरगाव येथील एस एस जी एम महाविद्यालयाच्या विकास समितीचे सदस्य म्हणून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असण्या बरोबरच राजकिय व सामाजिक क्षेत्रात काम करणारे संदीप वर्पे यांचे हे प्रयत्न व यश प्रेरणादायी असून त्याबद्दल त्यांचे जनमानसात कौतुक होत आहे.