नगरपालिका निवडणुक 2025

राजेंद्र  झावरे यांचा  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा सह संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा

मनिष जाधव 9823752964

राजेंद्र  झावरे यांचा  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा सह संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी)- शिवसेनेत निष्ठेने काम करणारे माजी जिल्हाप्रमुख, उत्तर नगर जिल्हा सह संपर्क प्रमुख राजेंद्र मुरलीधर झावरे यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा सह संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिल्याने कोपरगाव शहरासह उत्तर नगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

ओ
Oplus_131072

राजेंद्र झावरे हे गेल्या चार दशकनापासून शिवसेनेशी ऐकनिष्ठ राहीलेले होते. कोपरगाव तालुक्यातील प्रस्थापित नेत्याविरुद्ध त्यांनी कोपरगावात शिवसेना वाढवली.नगर शहरा व्यतिरिक्त जिल्ह्यात कोठे शिवसेनेचा दबदबा होता तर तो कोपरगाव येथे होता. शिवसेना तळागाळात पर्यंत वाढवण्याचे काम झावरे यांनी केले. मात्र त्यांच्या अश्या राजीनाम्यामुळे अनेक राजकीय मंडळींना धक्का बसला आहे.शिवसेनेत बंड झाले माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत न राहण्याचा निर्णय झाल्यावर शिवसेना दोन गटात विभागली गेली.तेव्हा झावरे यांना अनेक ऑफर असताना देखील त्यांनी त्या नाकारत. कोपरगाव शिवसेनेत बंड होऊ दिले नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वरच्या निष्ठा कायम ठेवत पक्षाचे काम करत राहिलेले झावरे यांनी असा अचानक राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. आगामी काळात पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजेंद्र झावरे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

Back to top button
Don`t copy text!