राजा वीरभद्र यात्रेनिमित्त संवत्सरला
बुधवारी इंदुरीकर महाराज यांचे किर्तन
कोपरगाव प्रतिनिधी मनिष जाधव -संवत्सर परिसरातील बिरोबा चोक येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी दि. १२ व १३ फेब्रुवारी २०२५ रोजी ग्रामदैवत श्री राजा वीरभद्र महाराज यांच्या यात्रा महोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहे. यानिमित्ताने बुधवार दि. १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता ज्येष्ठ किर्तनकार ह. भ. प. निवृत्ती महाराज देशमुख ( इंदुरीकर) यांचा किर्तनाचा कार्यक्रम होणार असून भाविकानी किर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन राजा वीरभद्र मंडळ पंच कमेटी व संवत्सर ग्रामस्थांनी केले आहे.
श्री राजा वीरभद्र महाराज यांच्या यात्रा महोत्सवानिमित्त बुधवार दि. १२ रोजी पहाटे ४ ते ९ वाजेपर्यंत मंदिरात विधी व पूजन, सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत कावडीची मिरवणूक, सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत ह. भ. प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांचे किर्तन, सायंकाळी ४ ते ६ वाजेपर्यंत काठी पूजन व काठीची मिरवणूक, रात्री ९ वाजता भजनी मंडळाचा भजन व जागर कार्यक्रम होणार आहे. तर गुरुवार दि. १३ रोजी सकाळी ७ वाजता होईकाचा कार्यक्रम होणार आहे. या यात्रेनिमित्त व्यावसायिकांच्या दुकाना थाटल्या जाणार आहेत. त्यात विविध खेळणी, मिठाई, प्रसाद, कपडे अशा दुकानांचा सहभाग असणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या यात्रोत्सवाचा व किर्तन सोहळ्याचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन संवत्सर ग्रामस्थांनी केले आहे.