राजकारणापलीकडे माणुसकी जपणारे – सुहास साहेबराव कुदळे…
राजकारणाबाबत सर्वसामान्य लोकांच्या मनात काही शंका असतात. विशेषत,राजकारणी लोकांबाबत.. केवळ मतदानापुरते नागरिकांच्या गाठी – भेटी घेणारे राजकीय नेते वर्ष – वर्ष आपल्या भागात फिरकत नसतात.या पार्शर्वभूमीवर आपल्या भागातील लोकांच्या अडी -अडचणी सोडवण्यासाठी जीवाचे रान करणारे, आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारे सुहास कुदळे वेगळे ठरतात.! पिंपरी हे पिंपरी चिंचवड. शहरातील पवना नदी किनाऱ्यावर वसलेले एखाद्या बेटा सारखे गाव तसे विविधतेने नटलेले. वारकरी संप्रदायाची शंभराहून जास्त वर्षाची परंपरा लाभलेल्या या गावात भजन ,कीर्तन, काकडा आरती, सप्ताह या सारखे अनेक कार्यक्रम जोमाने साजरे केले जातात. याशिवाय खेळाचे महत्त्व जाणून असलेल्या या गावात पैलवानाचा मोठा वारसा लाभला आहे. त्याच संस्कारात वाढलेले घडलेले सामाजिक कार्यकर्ते म्हणजे पिंपरी चिंचवड मधील मधील न्हवे तर महाराष्ट्रातील दोस्तीचा दुनियेतील राजा माणूस सुहास कुदळे. राजकारणापलीकडे माणुसकी जपणारा , लहानापासून, थोरापर्यंत कायम मदतीला धावणारे नेतृत्व अशी ओळख असणारे सुहास कुदळे हे गेली कित्येक वर्ष या परिसरासाठी झटत आहेत.
सुहास कुदळे यांनी केलेल्या कामांची यादीही पुष्कळ मोठी आहे.आपल्या माणसांची आरोग्याची काळजी घेताना सुहास कुदळे अग्रभागी असतात. कोरोना काळातील मदत असो वा महाराष्ट्र पोलीस बांधवाना लागणारी मदत आपण या मार्फत सुहास कुदळे यांचे निस्वार्थी काम बघितले असेल. ८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण – काम करताना सर्व जातीधर्माच्या घटकांना सामावून घेऊन काम करणे हे सुहास कुदळे यांचे वैशिष्ठ.गणपती उत्सव व नवरात्री उत्सव अन्नदान खूप मोठ्या प्रमाणावर करण्यासाठी सुहास कुदळे यांची तळमळ आपण बघितलं असेल. सुहास भाऊ कुदळे मितभाषी – मनमिळावू स्वभावामुळे प्रत्येक माणसाला आपलसं करतात. आश्वासनापेक्षा नागरिकांची सतत मदत करणे, लोकांची बाजू समजावून घेऊन त्यांना सहकार्य करणे तसेच काम घेवून येणार माणूस भले ओळखीचा असो वा ओळखीचा नसो ते आपला घरातला माणूस या प्रमाणे त्याचे काम कसे होईल यासाठी पूर्ण निस्वार्थी प्रयत्न करत असतात. याचं गुणामुळे पूर्ण पिंपरी चिंचवड शहरात न्हवे तर पूर्ण महाराष्ट्रात आपल्या हक्काचा माणूस म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. भविष्यात सुहास साहेबराव कुदळे यांचा राजकीय प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये मा.श्री शरद पवार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.सुहास कुदळे यांची मूर्ती लहान पण कीर्ती महान याप्रमाणे त्यांच्या कामाची दखल अनेक वेळा समाजरत्न पुरस्कार देवून घेतलेली आहे. भविष्यातील त्यांच्या वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा…