येवला विधानसभा निवडणुकीत प्रत्येक नागरिकांनी मतदानाचा हक्क बजवावा- मुख्याधिकारी तुषार आहेर
येवला प्रतिनिधी – येवला नगरपरिषद येवला स्वीप अंतर्गत येवला विधानसभा मतदारसंघात सेल्फी पॉईंट च्या माध्यमातून मतदार जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी, या उद्देशाने निवडणूक विभागाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
या अनुषंगाने 17 ऑक्टोबर पासून येवला विधानसभा मतदारसंघात मतदानाची गीते, घोषवाक्य, पथनाट्य रांगोळी स्पर्धा निबंध चित्रकला स्पर्धाआदींच्या माध्यमातून कमी मतदान झालेल्या भागामध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या पालकांकडून संकल्पपत्र भरुन घेतले जाणार आहे. तसेच चुनाव पाठशाला हा उपक्रमही राबविला येणार आहे.या कार्यक्रमात निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, गटशिक्षणाधिकारी कुसळकर साहेब आदींचे उपमुख्यधिकारी चंद्रकांत भोये रोहित पगार विशेष सहकार्य लाभणार आहे.
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत लोकशाही परंपरेचे पावित्र्य राखुन कुठल्याही प्रकारच्या आमिषाला बळी न पडता निस्वार्थ, नि:पक्षपणे कुठलीही जात धर्म भाषा न बघता प्रत्येक नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा – तुषार आहेर, मुख्याधिकारी येवला नगरपरिषद येवला