आपला जिल्हा

मेहनत करे मुर्गी अंडा खाये फकीर !

मनिष जाधव 9823752964

मेहनत करे मुर्गी अंडा खाये फकीर !

श्रीगोंदा दादा सोनवणे प्रतिनिधी :– श्रीगोंदा तालुक्यातील एक गावात अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवली असता त्यांना दौंड येथील एक नामवंत डॉक्टर ने गर्भपात  केल्याचा प्रकार पोलिसांच्या लक्षात आल्यावर तपासी अधिकारी सोडून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत लक्षीदर्शन करून घेतल्याची जोरदार चर्चा आहे त्यामुळे मेहनत करे मुर्गी आणि फकीर खाये अंडा या म्हणीचा प्रत्यय येतोय असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही.
श्रीगोंदा तालुक्यातील नगर – दौंड रोडवरील एका गावात एका अल्पवयीन मुलीचा बलात्कार झाल्याची घटना घडली असता याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक यांच्याकडे तपास सोपविण्यात आला मग  तपासाची  चक्रे फिरवली असता त्यांच्या लक्षात आले की याच मुलीचा गर्भपात करण्यासाठी दौंड येथील नामवंत डॉक्टरने गर्भपात करण्यासाठी तब्बल ६५ हजार रुपये घेऊन त्या मुलीचा गर्भपात केल्याची बाब पोलिसांच्या लक्षात आली त्यांनी तात्काळ दौंड येथून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात डॉक्टर याना बोलावले सुरवातीला किरकोळ विचारपूस झाली आणि मग शाब्दिक चकमक त्यात तुम्ही बेफिकीर पणे इतके मोठे रुग्णालय चालवता असे असेन आरोप डॉक्टर वर ठेवण्यात आले मग डॉक्टर हतबल झाले व तपासी अधिकारी यांना कसल्याही प्रकारे विचारात न घेता वरिष्ठ अधिकारी यांचेकडून सुरवातीला ५ लाखाची मागणी करण्यात आली मात्र डॉक्टर तयार होत नव्हता शेवटी मुंबई बसणाऱ्या एक सिनियर पोलीस निरीक्षक यांनी मध्यस्थी करत ते प्रकरण १लाख रुपयात तडजोडी ने दडपण्याचा प्रकार झाला परंतु सदर तपास पोलीस उपनिरीक्षक यांचेकडे असताना वरीष्ठ अधिकाऱ्याने कसल्याही प्रकारची माहिती न देता डाँक्टर बरोबर गैरव्यवहार करून लक्षीदर्शन करून घेतले आहे त्यामुळे मेहनत करे तपासी अधिकारी अंडा खाये वरिष्ठ अधिकारी  असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही.
अनेक तपासी अधिकारी यांच्या कामात वाढता हस्तक्षेप ?
तालुक्यातील काहीही घटना घडली की त्याबाबत फिर्यादीतर्फे श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येतो त्याचा तपास नावापुरते पोलिसांकडे देण्यात येतो मात्र काहीतरी शंकेची सुई सापडली की लगेच वरिष्ठ अधिकारी यामध्ये हस्तक्षेप करतात त्यामुळे अनेक तपासी अधिकारी हे वरिष्ठ अधिकारी यांच्यावर मोठ्या प्रमाणात नाराज आहेत पण वरिष्ठ अधिकारी असल्यामुळे कोणीही समोर येण्यास तयार होत नाही
मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!