
महाराष्ट्र राज्य चॉकबॉल असोसिएशनच्या अहील्यानगर संघटनेच्या अध्यक्षपदी सौ. सुनीता मकरंद कोऱ्हाळकर यांची तर सचिव पदी श्री.अनुप अनिल गिरमे सर यांची निवड
कोपरगाव प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य चॉकबॉल असो. च्या मान्यतेने नवनिर्वाचित अध्यक्षा सौ.रेणुकाताई विवेकभैय्या कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली व जेष्ठ मार्गदर्शक श्री.मकरंद कोऱ्हाळकर यांच्या सहकार्याने अहील्यानगर संघटनेच्या अध्यक्ष पदी सौ.सुनीता मकरंद कोऱ्हाळकर यांची तर सचिव पदी श्री.अनुप अनिल गिरमे सर यांची निवड करण्यात आली आहे.



लवकरच पुढील कार्यकारिणी सदस्य जाहीर करण्यात येतील असे मकरंद कोरहाळकर सर यांनी सांगितले. नूतन अध्यक्ष व सचिव यांच्या निवडीबद्दल उभयतांचे महाराष्ट्र राज्य असोसिएशन अध्यक्षा सौ.रेणुका ताई विवेक भैय्या कोल्हे,महाराष्ट्र सचिव श्री. सुरेश गांधी यांनी अभिनंदन केले आहे.