मनमाड चा ब्रिटिश कालीन रेल्वे ओव्हर ब्रीज कोसळला ; महामार्ग बंद
मनमाड प्रतिनिधी – मनमाड शहरातून जाणारा इंदूर-पुणे महामार्गावरील ब्रिटिशकालीन ओव्हर ब्रिज बुधवारी पहाटे त्याचा काही भाग अचानक कोसळतच दोन्ही बाजूकडील वाहतूक ठप्प झाली आहे.
झालेल्या दुर्घटनेत कोणाचीही जीवित हानी झाली नाही. मात्र धुळे-शिर्डी मार्गावरील हाच एक रेल्वेवरील प्रमुख पूल असल्याने वाहतुकीची समस्याच गंभीर होणार आहे. या ब्रिटीशकालीन पुलाचा मध्यभाग ढासळला असून यामुळे इंदूर-पुणे महामार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. या मार्गावरील पुण्याकडील वाहतूक येवला येथून तर इंदूर येथून येणारी वाहतूक मालेगाव येथून वळवण्यात आली आहे. पण यामुळे मनमाड शहराचे सध्या दोन भाग झाले असून साधी लहान चारचाकी गाडीही दुसऱ्या भागात जाऊ शकत नसल्याने अनेकांची गैरसोय होणार आहे तर पोलिस प्रशासनासह इतर प्रशासनाला मोठी डोकेदुखी वाढली आहे.