
भावी नगराध्यक्ष दीपक वाजे यांचे सोशल मीडियावर व नागरिकांमध्ये वाढते वर्चस्व
कोपरगाव (प्रतिनिधी मनिष जाधव) – नगराध्यक्ष पदाचे प्रबळ दावेदार म्हणून ओळखले जाणारे साई देवा प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष दीपकभाऊ वाजे हे सध्या सोशल मीडियावर तसेच नागरिकांच्या गाठीभेटींमधून प्रचंड चर्चेत आले आहेत. त्यांच्या लोकसंग्रहशील स्वभावामुळे आणि जनतेशी थेट संवाद साधण्याच्या पध्दतीमुळे त्यांचा जनसंपर्क दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.


दीपक वाजे हे सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या, स्थानिक घडामोडी आणि विकास विषयांवर सतत संवाद साधत आहेत. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप गटांमधून ते नियमितपणे नागरिकांच्या मतांना प्रतिसाद देतात. त्यामुळे युवक वर्गासह सर्वसामान्य जनतेत त्यांची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे.

फक्त सोशल मीडियापुरतेच नव्हे तर ते प्रत्यक्ष गाठीभेटी घेत नागरिकांच्या अडचणी जाणून घेत आहेत. शहरातील विविध भागात फिरून त्यांनी अनेक समाज घटकांचा विश्वास जिंकला आहे. या भेटींमुळे नागरिकांमध्ये “वाजे म्हणजे आपला माणूस” अशी भावना निर्माण होत आहे.

नागरिकांचे म्हणणे आहे की, “दीपक वाजे हे फक्त बोलतातच नाहीत, तर काम करून दाखवतात. त्यांच्या कार्यशैलीत पारदर्शकता आणि तातडीने निर्णय घेण्याची वृत्ती दिसते.”

सोशल मीडियावर वाढते समर्थन, नागरिकांशी थेट संवाद आणि सर्वसमावेशक दृष्टिकोन यामुळे दीपक वाजे हे आगामी निवडणुकीत एक प्रभावी आणि जनतेशी जोडलेले व्यक्तिमत्त्व म्हणून नगराध्यक्ष पदासाठी उभे राहत आहेत.














