भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा
संगमनेर प्रतिनिधी – भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री विद्यालयांमध्ये आज गुरुवार दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन मुख्याध्यापक श्री के.जी खेमनर सर यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. सी व्ही रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सरचिटणीस मा. श्रीमती रंजनाताई गवांदे यांनी डॉ. सी. व्ही रमण यांच्या विज्ञान क्षेत्रातील कार्य व योगदानासंबंधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच विज्ञानाच्या माध्यमातून समाजातील अंधश्रद्धा व चुकीच्या रूढी परंपरांना प्रतिबंध घालण्याचे आव्हानही त्यांनी केले.
विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे माजी प्राचार्य मा. श्री ओझा सर यांनी डॉ. सी व्ही रमण यांचे विचार आचरणात आणून, वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारून समाजाला पुढे नेण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री के जी खेमनर सर यांनी आपल्या प्रास्ताविकातून डॉ. सी व्ही रमण यांचे जीवन चरित्र व कार्याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री पवार डी एम, शिक्षिका सौ दिघे मॅडम, विज्ञान शिक्षक श्री मिलिंद औटी सर, श्री अभंग सर, श्री गायकवाड सर, श्री वालझाडे सर, श्रीमती सुवर्णा रहाणे, श्रीमती संपदा देशमुख, श्रीमती आरती देशमुख, श्रीमती भोर मॅडम, तसेच श्री गुंजाळ डी व्ही श्री शेळके जी. एल, श्री दारोळे सर, श्रीमती घोरपडे मॅडम, श्रीमती वलवे मॅडम, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अण्णासाहेब दिघे सर यांनी केले व श्री उमेश नेहे सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.