आपला जिल्हामहाराष्ट्र

भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री विद्यालयात इयत्ता दहावी चा विद्यार्थी पालक शिक्षक संयुक्त मेळावा संपन्न

मनिष जाधव 9823752964

भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री विद्यालयात इयत्ता दहावी चा विद्यार्थी पालक शिक्षक संयुक्त मेळावा संपन्न

ऐ

संगमनेर प्रतिनिधी मनिष जाधव – 
आज शुक्रवार दिनांक 04 ऑक्टोबर 2024 रोजी भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री विद्यालयात इयत्ता 10वीच्या विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांचा संयुक्त मेळावा पार पडला .

अ
या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय के. जी खेमनर सर होते. तर प्रमुख अतिथी म्हणून पालक प्रतिनिधी मा. पंचायत समिती सदस्य मा. श्री विष्णुपंत रहाटळ , सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाज संस्थेतील सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री क्षीरसागर सर, संगमनेर मधील प्रतिथयश औषध व्यवसायिक माननीय श्री गिरीश शेठ पानसरे, सौ वर्षा ताई करपे, तसेच विद्यालयाचे उपमुख्याध्यापक मा .श्री डोके सर पर्यवेक्षक मा श्री पवार सर उपस्थित होते.

 

ओ

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक प्रतिनिधी श्री दिघे सर यांनी केले . या वेळी दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.तसेच उपस्थित विद्यार्थ्यांना मान्यवर अतिथींनी बहुमोल मार्गदर्शन केले . विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक प्रतिनिधींनी बहुमोल सूचना केल्या.

ऊ
विद्यार्थ्यांच्या अंगी नम्रता हा गुण असल्याशिवाय विद्यार्थी जीवनात यशस्वी होत नाही ,असे प्रतिपादन श्री क्षीरसागर सर यांनी केले .तर विद्यार्थी हा सतत ज्ञानार्थी राहिला पाहिजे आजीवन त्याने सतत वेगवेगळ्या विषयांचे ज्ञान मिळवले पाहिजे स्वतःची प्रगती केली पाहिजे अशी अपेक्षा श्री विष्णुपंत राहटळ यांनी या प्रसंगी व्यक्त केली. यावेळी प्राचार्य के .जी खेमनर सर यांनी
विद्यालयात राबवत असलेल्या विविध उपक्रम, प्रकल्प स्पर्धा परीक्षा आणि गुणवत्ता वाढीसाठीचे प्रयत्न याबाबत सखोल मार्गदर्शन केले .या वेळी इयत्ता दहावीच्या सर्व तुकड्यांचे वर्गशिक्षक तसेच पालक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच दहावीचे वर्ग शिक्षक श्री.अभंग आर एल.,श्री.नेहे यु. आर. श्री. गायकवाड ए. ए. श्री.वालझाडे सर श्री.आल्हाट के. बी. व श्रीमती.देशमुख एस. बी. उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीमती सीमा देशमुख मॅडम यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांचे अनमोल सहकार्य लाभले.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!