भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री ज्युनिअर कॉलेजमध्ये जागतिक महिला दिन संपन्न!
संगमनेर : जागतिक महिला दिन संपूर्ण जगभर साजरा केला जाणारा महिलांचा सन्मान करणारा आजचा दिवस. या निमित्ताने भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री ज्युनिअर कॉलेज मध्ये महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी संगमनेर नगरपालिकेच्या मा. नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे उपस्थित होत्या. या प्रसंगी त्यांनी उपस्थित महिला शिक्षिका व विद्यार्थिनींना मोलाचे मार्गदर्शन केले. एका महिलेने ठरवलं तर ती आपल्या कार्याचा ठसा समाजात निर्माण करू शकते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कॉलेज चे प्राचार्य के. जी. खेमनर सर यांनी भूषविले. आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना त्यांनी उपस्थित सर्व महिला शिक्षिका व विद्यार्थिनींना महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
कॉलेजचे उपप्राचार्य प्रा. संजय सुरसे सर यांनी अनमोल मार्गदर्शन केले. त्याचबरोबर प्रा. सुपेकर मॅडम यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक प्रतिनिधी प्रा. गणेश गुंजाळ यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांचे मोलाचे सहकार्य लाभले.