बुधवारी कोजागिरी पौर्णिमा उत्सव व बक्षिस वितरण समारंभाचे आयोजन – जनार्दन कदम
कोपरगाव प्रतिनिधी मनिष जाधव – कोपरगाव येथील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यात कायमच अग्रेसर असलेले साई निवारा मित्र मंडळ श्री सप्तश्रृंगी माता मंदिर नवरात्रोत्सव २०२४ निमित्ताने महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे व कोपरगावच्या माजी नगराध्यक्षा सौ. सुहासिनी कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार दि. १६ ऑक्टोबर २०२४ रोजी सायं. ६ वा. कोजागिरी पौर्णिमा उत्सव विविध स्पर्धा व बक्षिस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त नागरिकांनी, भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन मा. सभापती, सार्वजनिक बांधकाम समिती, मा. नगरसेवक, साई निवारा मित्र मंडळाचे अध्यक्ष जनार्दन सुधाकर कदम यांनी केले आहे.

मा.श्री. व सौ. जितुभाई शहा (संचालक, समता पतसंस्था), मा.श्री. व सौ. अरविंदभाई पटेल (संचालक, समता पतसंस्था), मा.श्री. व सौ. चांगदेव शिरोडे (संचालक, समता पतसंस्था), मा.श्री. व सौ. निरव रावलिया (संचालक, समता पतसंस्था), मा.श्री. व सौ. सचिन भट्टड (मुख्य कार्यकारी अधिकारी, समता पतसंस्था), मा.श्री. व सौ. सुरेंद्रजी व्यास (अध्यक्ष, निवारा मित्र मंडळ) यांच्या शुभहस्ते आरती होणार आहे. याप्रसंगी महाप्रसाद (सुरूची भोजन) चे देखील आयोजन करण्यात आले असल्याचे जनार्दन कदम यांनी सांगितले.
