बाळासाहेबांचे विचार व त्यांचे कार्य आम्ही तळागाळापर्यंत पोहोचवणार – राम गल्हे
राहुरी प्रतिनिधी अक्षय करपे –
राहुरी तालुक्यातील महाडूक सेंटर येथील प्रगतशील शेतकरी राम राजेंद्र गल्हे यांची बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) राहुरी तालुका उपतालुका प्रमुख पदी निवड झाली असुन त्यांचा राहुरी तालुक्याच्या वतीने तालुकाप्रमुख सुनील कराळे यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.

सत्कारास उत्तर देतांना राम गल्हे बोलतांना म्हणाले की, आगामी काळामध्ये ग्रामीण भागातील तळागाळात बाळासाहेबांचे विचार त्यांचे कार्य आम्ही तळागाळापर्यंत नेण्याचा निश्चितच प्रामाणिक प्रयत्न करुन तालुक्यात मोठी शक्ती उभी करणार असल्याचे मत राम गल्हे यांनी व्यक्त केले. यावेळी उत्तर तालुकाप्रमुख सुनील कराळे, दक्षिण तालुकाप्रमुख शिवश्री देवेंद्र लांबे, अशोक तनपुरे, राहुल पवार, जयंतराव पवार, अनिल गायकवाड उपस्थित होते.