Uncategorized

बारावीच्या निकालाप्रमाणे दहावीचा निकालही घसरला

मनिष जाधव 9823752964

बारावीच्या निकालाप्रमाणे दहावीचा निकालही घसरला

पुणे प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीनंतर आता दहावीचा निकालही जाहीर केला आहे. बारावीच्या निकालाप्रमाणे दहावीचा निकालही घसरला आहे. यंदा दहावीचा निकाल 93.83 टक्के इतका लागला. गेल्यावर्षी हा निकाल 96.94 टक्के इतका होता. त्या तुलनेत यंदाच्या निकालात 3.11 टक्के घसरण झालीय. 10 वी चा निकाल हा बेस्ट 5 प्रमाणे लावला असून यात टक्केवारी धरताना बेस्ट ऑफ 5 विषया्ची धरली जाते.

ना

दहावीच्या परीक्षेला एकूण 15 लाख 29 हजार 666 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 14 लाख 34 हजार 898 विद्यार्थी पास झाले. मुलींची टक्केवारी 95.87 तर मुलांची टक्केवारी 92.5 इतकी आहे. राज्यातील 43 शाळांचा निकाल शुन्य टक्के लागला आहे. तर 100 टक्के निकालांची शाळा संख्या 6 हजार 844 इतकी आहे. 29.4 टक्के शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. राज्यभरातील ५ हजार ३३ केंद्रांवर दहावीची परीक्षा झाली होती. दहावीचा निकाल कधी जाहीर होणार याची उत्सुकता होती. मात्र, आता निकालाची तारीख जाहीर झाली आहे. आज २ जूनला निकाल जाहीर झाल्यावर विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर जाऊन निकालाची ऑनलाईन प्रिंटआऊट काढून घेता येणार आहे.

दहावीच्या निकालात १५१ विद्यार्थ्यांना १०० टक्के मार्क; पाहा विभागनिहाय आकडेवारी

१०० टक्के मार्क मिळवले विभागीय विद्यार्थी संख्या

पुणे: ५

औरंगाबाद: २२

मुंबई: ६

अमरावती: ७

लातूर: १०८

कोकण: ३

 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!