आपला जिल्हानगरपालिका निवडणुक 2025

प्रभाग ८ मध्ये वर्षा शिंगाडे पुन्हा मैदानात; माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवारीची तयारी

मनिष जाधव 9823752964

ओ
Oplus_131072

प्रभाग ८ मध्ये वर्षा शिंगाडे पुन्हा मैदानात; माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवारीची तयारी

कोपरगाव मनिष जाधव – प्रभाग क्रमांक ८ हा राजकीय दृष्टीने महत्त्वाचा असुन याच प्रभागात शिवसेना कोपरगाव उपशहरप्रमुख कै. प्रफुल्ल शिंगाडे यांच्या पत्नी उबाठा शिवसेना गटाच्या माजी नगरसेविका वर्षाताई प्रफुल्ल शिंगाडे या पुन्हा एकदा शिवसेनेचे नेते माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली त्या पुन्हा जनतेच्या सेवेसाठी सज्ज झाल्या आहेत. तसेच शिवसेनेचे नेते राजेंद्र झावरे देखील नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी करणार आहे.

शिंगाडे
वर्षा शिंगाडे या त्यांच्या प्रभागात ओळखल्या जाणाऱ्या कार्यकर्त्या आहेत. नगरसेविका पदावर कार्यरत असताना त्यांनी नागरिकांच्या दैनंदिन समस्या सोडविण्यावर विशेष भर दिला होता. स्वच्छता, महिला सक्षमीकरण, रस्त्यांची देखभाल, तसेच सामाजिक उपक्रमां मधील सक्रिय सहभागामुळे त्यांनी प्रभागात चांगली छाप पाडली आहे.

प्रफुल्ल

राजेंद्र झावरे यांच्या नेतृत्वाखालील गटात वर्षा शिंगाडे यांचा प्रभावी सहभाग राहिला असून, झावरे गटाकडून पुन्हा प्रभाग ८ मध्ये मजबूत पकड निर्माण करण्यासाठी त्यांची उमेदवारी महत्त्वाची ठरणार आहे. स्थानिक महिलांमध्ये, युवकांमध्ये आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये त्यांचा सखोल संवाद आणि सततचा संपर्क हे त्यांचे बलस्थान मानले जाते.

सध्या प्रभागातील राजकीय समीकरणे रंगतदार बनली असून, वर्षा शिंगाडे यांच्या पुन्हा मैदानात उतरल्याने निवडणूक लढत अधिक चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांचा अनुभव, कार्यकाळातील कामगिरी आणि झावरे यांचे मजबूत राजकीय मार्गदर्शन या तिन्ही घटकांमुळे या उमेदवारीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिंगाडे
Oplus_16908288
मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

Back to top button
Don`t copy text!