आपला जिल्हानगरपालिका निवडणुक 2025

“प्रभाग क्रमांक ७ मध्ये स्वप्नील पवारांची दमदार एंट्री

मनिष जाधव 9823752964

“प्रभाग क्रमांक ७ मध्ये स्वप्नील पवारांची दमदार एंट्री

– कष्टाळू आणि सर्वसामान्य युवक नेतृत्त्वाकडून नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या!”

कोपरगाव मनिष जाधव प्रतिनिधी – कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत असताना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष स्वप्नील पवार हे प्रभाग क्रमांक ७ मधून जिल्हाध्यक्ष संदीप वर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवारी करणार असल्याने पवार यांच्या नावाला पसंती तसेच युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

स्वप्नील पवार
Oplus_16908288

स्वप्नील पवार हे आपल्या प्रामाणिकपणा, कष्टाळूपणा आणि सर्वसामान्य विचारसरणीसाठी ओळखले जातात. लहानपणापासूनच साध्या घरातून पुढे आलेले स्वप्नील यांनी संघर्षातून आपली वाट तयार केली आहे. सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग, युवकांच्या समस्या सोडविण्यासाठी घेतलेले पुढाकार आणि सामान्य नागरिकांशी कायम जिव्हाळ्याचे संबंध या त्यांच्या कार्यशैलीच्या वैशिष्ट्यांमुळे त्यांनी स्थानिक पातळीवर भक्कम ओळख निर्माण केली आहे.

पवार
Oplus_16908288

युवक काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत — बेरोजगार युवकांसाठी मार्गदर्शन शिबिरे, रक्तदान शिबिरे, पर्यावरण संवर्धन मोहीम, तसेच नागरिकांच्या दैनंदिन समस्या प्रशासनापर्यंत पोहोचविणे अशा विविध उपक्रमांतून त्यांनी तरुणाईला एकत्र आणले आहे.

प्रभाग क्रमांक ७ मधील इच्छुक उमेदवार स्वप्नील पवार “कष्टाने पुढे आलेला, सर्वसामान्यांशी घट्ट नातं ठेवणारा आणि लोकांसाठी नेहमी उपलब्ध राहणारा उमेदवार” अशी ओळख त्यांच्या कार्यातून होणार आहे.

शहरातील अनेक तरुणांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी “स्वप्नील पवार हे तरुणाईचे खरे प्रतिनिधी आहेत; प्रामाणिक नेतृत्वाची गरज असताना त्यांचे नाव समोर आले ही प्रभागासाठी अभिमानाची बाब आहे,” अशी प्रतिक्रिया जनतेतून येत आहे. स्वप्नील पवार यांनी उमेदवारी स्विकारण्यास नक्कीच प्रभाग क्रमांक ७ मध्ये चुरस निर्माण होणार आहे .

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!