आपला जिल्हानगरपालिका निवडणुक 2025

प्रभागातील समीकरणं बदलण्याची क्षमता असलेलं नाव – सचिन परदेशी”

मनिष जाधव 9823752964

प्रभागातील समीकरणं बदलण्याची क्षमता असलेलं नाव – सचिन परदेशी”
कोपरगाव मनिष जाधव – कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १५ मध्ये सचिन परदेशी यांचे नाव सध्या सर्वाधिक चर्चेत आहे. सामाजिक कार्य, लोकसंपर्क आणि विकासाभिमुख दृष्टिकोन यामुळे परदेशी हे एक सक्षम आणि प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून ओळख निर्माण झाली आहे. नागरिकांचा ठाम सूर असा आहे की, “प्रभाग क्रमांक १५ मध्ये सचिन परदेशी यांच्या शिवाय पर्याय नाही.” त्यांच्या कामाची पद्धत, सर्व समाज घटकांशी असलेला संपर्क आणि प्रभागातील समस्या सोडवण्याची तत्परता यामुळे नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विशेष आदर आहे हे देखील तितकेच सत्य आहे‌.
 सचिन परदेशी
सचिन परदेशी
सचिन परदेशी हे आमदार आशुतोष काळे यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून सगळीकडे परिचित असुन आ. काळे यांच्या नेतृत्वाखालील विकासाच्या ध्येयधोरणात परदेशी यांनी नेहमीच सक्रिय सहभाग नोंदवला आहे. त्यामुळेच त्यांनी जर या निवडणुकीत उमेदवारी स्वीकारली, तर प्रभाग क्रमांक १५ मध्ये काळे गटाचे वर्चस्व अधिक मजबूत होणार आहे.
मात्र, ते स्वतः उमेदवारी करणार की नाही, याबद्दल अद्याप अधिकृत भूमिका सचिन परदेशी यांनी जाहीर केलेली नाही. त्यांच्या निर्णयाकडे केवळ प्रभागातील नागरिकच नव्हे इतर प्रभागातील नागरिकांचे लक्ष लागलेले आहे. सचिन परदेशी यांनी उमेदवारी करणे बाबत निर्णय घेतल्यास तर प्रभाग क्रमांक १५ मधील निवडणुकीला नवे समीकरण मिळेल, हे निश्चित.
मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

Back to top button
Don`t copy text!