आपला जिल्हानगरपालिका निवडणुक 2025

प्रभागातील प्रतिसाद ही आमच्यासाठी प्रेरणादायी ताकद – जनार्दन कदम

मनिष जाधव 9823752964

प्रभागातील प्रतिसाद ही आमच्यासाठी प्रेरणादायी ताकद – जनार्दन कदम

अ
काका कोयटे

कोपरगाव मनिष जाधव – प्रभाग क्रमांक ३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व मित्र पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार कोयटे ओमप्रकाश दादाप्पा तसेच नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार निर्मला सोमनाथ आढाव आणि जनार्दन सुधाकर कदम यांच्या प्रचार मोहिमेला नुकतेच प्रभाग क्रमांक 3 मध्ये उत्साहवर्धक व जोशपूर्ण सुरुवात झाली.

कदम
Oplus_16908288

औ

स्थानिक नागरिक, कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने संपूर्ण प्रभागात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. विकासाच्या दृढ भूमिकेसह पारदर्शक कारभार, नागरिकांशी थेट संवाद आणि प्रभागातील मूलभूत सुविधांच्या उन्नतीची हमी यांचा संदेश देत उमेदवारांनी घराघरांत जाऊन मतदारांशी संवाद साधला. उमेदवारांच्या नेतृत्वगुणांना मिळणारे नागरिकांचे सकारात्मक प्रतिसाद आणि कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह पाहता, या त्रिसूत्री उमेदवारीकडून प्रभाग क्रमांक ३ मध्ये जनतेचा विश्वास मोठ्या प्रमाणावर मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

औओ

यावेळी संवाद साधताना नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार जनार्दन कदम म्हणाले की, प्रभागातील नागरिकांकडून मिळालेला भरघोस प्रतिसाद ही आमच्यासाठी प्रेरणादायी ताकद आहे. गेल्या कार्यकाळात मी प्रामाणिकपणे विकासकामे पूर्ण केली, प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्याच विश्वासाच्या बळावर यंदाही आपण सर्वांच्या सेवेसाठी पुढे आले आहे तसेच निर्मला आढाव यांचे नवे नेतृत्व आणि माझ्या अनुभवाचे बळ अशी सक्षम टीम प्रभाग ३ ला मिळाली आहे. आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कोयटे ओमप्रकाश दादाप्पा व आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनात आम्ही सर्वांगीण विकासाचा नवा अध्याय सुरू करू. जनतेने दाखवलेल्या विश्वासाचे सोने करून दाखवू असल्याचे जनार्दन कदम म्हणाले.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!