निवडणुकीत शिवसेनेला सन्मानजनक जागा न मिळाल्यास स्वबळावर निवडणुका लढवणार मा. खा. लोखंडे
शिर्डी प्रतिनिधी/शिर्डी येथील शिवसेना कार्यकर्त्यांची बैठक शिर्डी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली याप्रसंगी जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते माजी नगराध्यक्षा आनिता जगताप, उपनगराध्यक्ष विजय जगताप, राहुल गोंदकर, शहरप्रमुख योगेश जगताप, नगरसेविका आशा कोते , मंदाबाई गुंजाळ ,आदी सह विविध कार्यकर्त्यांच्या उपस्थित पार पडली प्रसंगी माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली ते म्हणाले की प्राधान्य महायुतीला असुन शिवसेनेला समाधानकारक जागा मिळाल्या पाहिजे ज्या ठिकाणी शिवसेनेचा आमदार असेल त्या ठिकाणी शिवसेनेला झुकते माप असावे जेथे भाजप राष्ट्रवादीचा आमदार असेल तिथे त्यांना अधिक जागा मिळतील शिर्डी नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेला अपेक्षित जागा न मिळाल्यास वेळप्रसंगी शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवणार असून वरिष्ठांनी आदेश दिल्यास पत्नी नंदाताई लोखंडे यांना नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उभे करणार असल्याचे जाहीर केले.

लोखंडे म्हणाले की शिर्डी लोकसभेच्या निवडणुकीत जनतेने मला खासदारकीची संधी दिली असून त्यात शिर्डी शहराचा देखील मोठा वाटा आहे त्यामुळे वेळप्रसंगी सर्वसामान्य कार्यकर्त्याला जरी नगराध्यक्ष पदाची संधी मिळाली तरी त्यास निवडून आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले याप्रसंगी बोलताना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कमलाकर कोते म्हणाले की शिर्डी नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाच जणांची कोअर कमिटी नियुक्ती केली असून त्यात त्यात कमलाकर कोते विजय जगताप राहुल गोंदकर सोमनाथ महाले हरिराम रहाणे यांचा समावेश असून लवकरच या संदर्भात नामदार राधाकृष्ण विखे पाटील विखे कारखान्याचे चेअरमन डॉ सुजय विखे. यांच्याशी चर्चा करून शिवसेनेची भूमिका मांडणार असल्याची सांगितले माजी नगराध्यक्ष आनिता जगताप म्हणाल्या की पक्षाच्या वतीने महायुती करून अथवा स्वबळावर निवडणुका लढवण्याचा निर्णय झाल्यास शिवसेनेची देखील पूर्ण तयारी आहे आपण दोन प्रभागाची जबाबदारी स्वीकारणार असल्याचे स्पष्ट केले याप्रसंगी दत्ता भालेराव, विलास कोते, सहदेव बडे, अनिल पवार, मच्छिंद्र गायके, संतोष जाधव, नवनाथ विश्वासराव, राजेंद्र कोते विरेश गोंदकर, नीता कोते, सोनाली गायके, मंदाबाई पवार, विजया गायकवाड, स्वाती महाले, योगिता गोंदकर, शुभांगी बाराहाते, स्नेहल कोते, वैशाली गोंदकर, मंगल कांदळकर, आदी महिला उपस्थित होते.
नगराध्यक्ष पदासाठी वेळप्रसंगी सौभाग्यवती लोखंडेंना उभे करणार माजी खासदार सदाशिव लोखंडे शिर्डी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदा बरोबरच साईबाबा संस्थानची विश्वस्त पद हे देखील बोनस म्हणून मिळत असल्याने अनेकांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीकडे लक्ष लागले असताना खासदार सदाशिव लोखंडे सौभाग्यवती मंदाताई लोखंडे यांचे नाव पुढे केल्यामुळे शिर्डी नगर परिषदेच्या निवडणुकीत मोठी चुरस वाढणार आहे.













