निळवंडे लाभधारकांवर ज्यांनी लाठ्या मारल्या तेच आज पाणी वाटण्याचे श्रेय घेत आहे – विजय गोर्डे
निळवंडे कालव्यांसाठी दीड टीएमसी पाणी मंजूर झाले त्यामुळे रांजणगाव,वेस,सोयेगाव,जवळके, धोंडेवाडी,बहादरपूर,बहादराबाद,अंजनापुर,मल्हारवाडी,काकडी,मनेगाव,डांगेवाडी व यासह परिसरातील नागरिक आनंद व्यक्त करत आहे.ज्यांनी एकेकाळी आमच्यावर लाठ्या मारण्याचे आदेश दिले ते आता निळवंडे धरण आणि पाण्याचे पूजन करत आहे हे हास्यास्पद आहे.ज्यांनी कायमच दडपशाही,निळवंडे होऊ नये म्हणून खोडा घातला त्यांच्या अध्यक्षतेखाली शेतकऱ्यांना बाहेर बसवून मीटिंग होते आणि जणू काही मी घरातून पाणी दिले अशा प्रकारचे श्रेय घेतले जाते हे दुर्दैवी आहे अशी प्रतिक्रिया निळवंडे लाभधारक विजय गोर्डे यांनी दिली आहे.
कालवा सल्लागर समितीची बैठक काल अहमदनगर येथे पार पडली.या बैठकीचे अध्यक्ष पालकमंत्री विखे होते.मात्र पूर्वीचा त्यांचा निळवंडे बाबतीतला इतिहास पाहता दीड टीएमसी पाणी वाढवून देण्यात राजकीय श्रेय नसून शेतकऱ्यांनी पुकारलेले आमरण उपोषण आणि रास्तारोको यामुळे आलेली नामुष्की आहे असा टोला विखे यांचे नाव न घेता गोर्डे यांनी लगावला आहे.
कालवा सल्लागर समिती बैठक सुरू असतानाच सामाजिक माध्यमातुन काहींनी अताताईपना करत आमच्यामुळे पाणी मिळाले असा श्रेय घेण्याचा किळसवाणा प्रकार केला.सर्वांच्या एकिमुळे हे पाणी मंजूर झाले आहे कोना एकट्या व्यक्तीने हे श्रेय घेण्यासाठी बाहुले पुढे करू नये असे शेतकरीवर्गामधून चर्चेला उधाण आले आहे.