आपला जिल्हानगरपालिका निवडणुक 2025

निर्मला आढाव आणि जनार्दन कदम   प्रभाग क्र. ३ मध्ये नव्या नेतृत्वाला अनुभवी हाताची साथ

मनिष जाधव 9823752964

निर्मला आढाव आणि जनार्दन कदम 

 प्रभाग क्र. ३ मध्ये नव्या नेतृत्वाला अनुभवी हाताची साथ

कोपरगाव मनिष जाधव – प्रभाग क्रमांक ३ मधील आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजितदादा पवार गट) कडुन आमदार आशुतोष काळे व ज्येष्ठ नेते ओमप्रकाश दादाप्पा कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली निर्मला सोमनाथ आढाव व जनार्दन कदम उमेदवारी करत आहेत.

आढाव
निर्मला सोमनाथ आढाव

माजी नगरसेवक जनार्दन कदम यांचा अनुभव आणि समर्थन चांगले लाभत आहे. “नवीन चेहरा… नवीन विचार… आणि नवीन संकल्प” या घोषणे निशी निर्मला आढाव हे प्रभागात नव्या आशा आणि विकासाचा संदेश देत आहेत.

ऊ
जनार्दन कदम

नगरसेवक म्हणून कार्यरत असताना जनार्दन कदम यांनी प्रभागातील रस्ते, गटारी, स्वच्छता, आरोग्य आणि सामाजिक कामातून उल्लेखनीय कामगिरी केली. नागरिकांच्या प्रश्नांवर तातडीने प्रतिसाद देणारी त्यांची कार्यशैली आणि पारदर्शक कामकाजामुळे प्रभागाच्या विकासात त्यांचा ठसा उमटला.

अ
काका कोयटे

हीच कामाची परंपरा पुढे नेण्यासाठी निर्मला आढाव नव्या उर्जेसह निवडणूक मैदानात उतरल्या असून, प्रभागातील महिलांचे प्रतिनिधित्व आणि नागरिकाभिमुख प्रशासनाचा नवा अध्याय लिहिण्याचा त्यांचा संकल्प आहे. आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली, नवीन नेतृत्व आणि अनुभवी हाताची जोड प्रभागाच्या विकासाला नवा वेग देणार, असा विश्वास स्थानिक नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

निर्मला आढाव यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक ३ मध्ये नव्या नेतृत्वाची ऊर्जा आणि जनार्दन कदम यांच्या अनुभवाची विश्वसनीय साथ असा शक्तिशाली समन्वय निर्माण होत आहे.”

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!