आपला जिल्हा

नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी 49.28 टक्के मतदान

संपादक मनिष जाधव 9823752964

नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी मतदान

नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी 49.28 टक्के मतदान

नाशिक प्रतिनिधी – नाशिक विभागात एकूण 338 मतदान केंद्र असून या सर्व मतदान केंद्रावर आज मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. विभागातील 2 लाख 62 हजार 678 मतदानापैकी 1 लाख 29 हजार 456 इतके मतदान झाले असून 49.28 टक्के मतदान झाल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपायुक्त (प्रशासन) रमेश काळे यांनी दिली.

नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी मतदान नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी

विभागातील नाशिक जिल्ह्यात एकूण 69 हजार 652 मतदारापैंकी 31 हजार 933 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून नाशिक जिल्ह्यात 45.85 टक्के मतदान झाले आहे. अहमदनगर जिल्ह्यात एकूण 1 लाख 15 हजार 638 मतदारापैंकी 58 हजार 283 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून अहमदनगर जिल्ह्यात 50.40 टक्के मतदान झाले आहे. धुळे जिल्ह्यात एकूण 23 हजार 412 मतदारापैंकी 11 हजार 822 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून 50.50 टक्के मतदान झाले आहे. जळगाव जिल्ह्यात एकूण 35 हजार 58 मतदारापैंकी 18 हजार 33 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून जिल्ह्यात 51.44 टक्के मतदान झाले आहे. नंदूरबार जिल्ह्यात एकूण 18 हजार 918 मतदारापैंकी 9 हजार 385 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून 49.61 टक्के इतके मतदान नंदूरबार जिल्ह्यात झाले आहे.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

Back to top button
Don`t copy text!