नव्या नेतृत्वाचा उदय: डॉ. तुषार गलांडे – कोपरगावसाठी ‘नवा चेहरा’, समाजात वाढता जनाधार

कोपरगाव मनिष जाधव – कोपरगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत नगरसेवकपद व नगराध्यक्षपदासाठी नवे चेहरे पुढे येत असून, त्यामध्ये आमदार आशुतोष काळे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे डॉ. तुषार गलांडे हे नाव विशेष चर्चेत आहे. समाजातील सर्वसामान्य घटकांपर्यंत पोहोचलेले, लोकाभिमुख विचारसरणीचे आणि शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले डॉ. गलांडे हे ओबीसी समाजासह माळी समाजात सक्षम नेतृत्व म्हणून पाहिले जात आहे.

याआधी विविध सामाजिक उपक्रम, आरोग्य शिबिरे व जनजागृती मोहीम मध्ये त्यांनी नागरिकांमध्ये विश्वासार्ह प्रतिमा निर्माण केली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत नागरिक व कार्यकर्ते त्यांना “नवा चेहरा” म्हणून संधी द्यावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.
स्थानिक राजकारणात नव्या ऊर्जेसह परिवर्तनाचे प्रतीक म्हणून डॉ. गलांडे यांचे नाव पुढे येत असून, युवक वर्ग तसेच समाजातील विविध घटकांकडून त्यांना वाढता पाठिंबा मिळत आहे. यामुळे कोपरगावच्या राजकीय वर्तुळात नवा उत्साह दिसून येत आहे.














