डासांसाठी औषधफवारणी व पाणी दिवस कमी नगरपालिका कधी करणार – माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील
कोपरगाव प्रतिनिधी – मागील वर्षातील सर्वात जास्त डासांची संख्या कोपरगाव शहरात सध्या झाली आहे. डासांमुळे होणारे आजार मोठ्या प्रमाणात लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत वाढताना शहरात दिसत आहे. वीजही सारखी जात आहे. यामुळे शहरवांसीयांचे जगणे अवघड झाले आहे.
नियमाप्रमाणे पावसाळा सुरू होण्याच्या आधी व पावसाळा चालू झाल्यावर औषध फवारणी होणे गरजेचे होते. जून महिना संपला, जुलै संपत आला . तरी अद्याप नगरपालिका औषध फवारणी करण्याकडे दुर्लक्ष करत आहेत.
तसेच येत्या दोन दिवसात कॅनलला पाणी येणार आहे असे कळते. या महिन्यात दुसऱ्यांदा कॅनलला पाणी येत आहे. सर्व तळे भरलेले असताना ,आता परत पाणी येत आहे.असे असून देखील सुद्धा जनतेने मागणी करूनही आठ दिवसा आड होणारा पाणीपुरवठा नगरपालिका हा पूर्ववत चार दिवसात करत नाही.
औषध फवारणी नाही , शहरातील रस्त्यांना पडलेली खड्डे देखील नगरपालिकेने बुजवले नाही . कॅनल या महिन्यात दोनदा सुटून सुद्धा पाणी असताना देखील पाणी दिवस नगरपालिका कमी करत नाही. मात्र दुसरीकडे नगरपालिका घरपट्टी चे वाटप मात्र घरोघरी जाऊन करत आहे व पट्टी भरण्यासाठी मागणी करत आहे. जनतेला सुविधा देण्याकडे दुर्लक्ष करायचे व दुसरीकडे एका अर्थाने जुलमी पद्धतीने आगाऊकर वसूल करायचा असा नगरपालिकेचा सध्याचा प्रकार चालू आहे. तरी नगरपालिकेने लोकांच्या मुलाबाळांच्या जीवाशी न खेळता तात्काळ औषध फवारणी डास निर्मूलनासाठी करावी व पाणीपुरवठा हा पूर्ववत चार दिवसात तात्काळ करावा.