टाकळी कडे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य सतिष नवले यांचे दुःखद निधन
श्रीगोंदा तालुका प्रतिनिधी दादा सोनवणे :- श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडे येथील माजी ग्रामपंचायत सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सतीश नवले यांचे खाजगी रुग्णालयात उपचाराच्या दरम्यान दुःखद निधन झाले आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत येथील तरुणाचे उमदे नेतृत्व म्हणून तसेच गोरगरीब जनतेचा कैवारी म्हणून तालुकाभर ख्याती असलेले टाकळी गावचे माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य व पाचपुते गटाचे खंदे समर्थक व राजेंद्र नागवडे यांचे कट्टर समर्थक सतीश योगीराज नवले हे किरकोळ आजाराने त्रस्त झाले होते त्यांना उपचारासाठी दौंड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते उपचारादरम्यान आज दि ६ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ च्या दरम्यान त्यांची प्राणजोत मालवली त्यांच्या अचानक जाण्याने नवले कुटूंबियासह संपूर्ण टाकळी कडे गावातील नागरिकांवर शोककळा पसरली आहे त्यांच्या मागे त्यांची आई रुक्मिणी पत्नी भाग्यश्री तसेच दोन लहान मुले असा त्यांचा परिवार आहे त्यांच्या पार्थिवावर दि ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.