जोगेश्वरी इंटरनॅशनल स्कूल चा शिष्यवृत्ती परीक्षेत १००% निकाल !!
कोपरगाव प्रतिनिधी मनिष जाधव – कोपरगाव तालुक्यातील डाऊच खुर्द येथील जोगेश्वरी इंटरनॅशनल स्कूल च्या इयत्ता ५ मधील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत घेतलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत ७ विद्यार्थी व विद्यार्थिनी परिक्षेस बसलेले होते त्यात सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.
या परिक्षेत २९४पैकी गुण मिळवून उत्तीर्ण झाले त्यात गौरेश गुरसळ २०४, समिक्षा वक्ते १८२,रिषभ होन १८० , आयान सय्यद १७२, साई बढे १६४, मो.हमजा शेख १५८ , श्लोक कुलकर्णी १४६ गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहे. स्कूल ने मिळवलेल्या घवघवीत यशाचा जिजाई बहुउद्देशीय शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष भास्करराव होन, सचिव सुनिल भास्करराव होन,यांच्या वतीने शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अजून प्रोत्साहन मिळावे तसेच पुढील शैक्षणिक आयुष्यात उत्तुंग यश संपादन करावे व आपल्या गावाचा,आपल्या पालकांचा नावलौकिक वाढवावा असे ध्येय समोर ठेवून संस्था व जोगेश्वरी इंटरनॅशनल स्कूल च्या वतीने सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही अध्यक्ष व सचिव यांनी दिली.
या परिक्षेसाठी अथक परिश्रम स्कूल च्या प्रा सौ ज्योती खरात , सौ स्वाती वक्ते, सौ सविता होन,सौ श्रध्दा पवार यांनी परिश्रम घेतले व विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक आयुष्यात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी संस्थेच्या मार्फत कटिबद्ध राहु असे आश्वासन दिले. त्याच बरोबर प्रसाद गवळी सौ अश्विनी होन या शिक्षकानीं व सौ मुक्ता तुवर, सत्यवान होन, वाल्मिक होन शिवाजी जाधव यांनी देखील परिश्रम घेतले. १००% निकाल लागल्याने या ऊतूंग यशाने पालक विद्यार्थी व पंचक्रोशीतील नागरिकांनी कौतुक केले व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.