जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत रेनबो स्कूलला रौप्यपदक…!
कोपरगाव प्रतिनिधी मनिष जाधव –शिक्षणमहर्षी लहानुभाऊ नागरे अण्णा स्थापित रेनबो इंटरनॅशनल स्कूल, जेऊर कुंभारी या शाळेतील इयत्ता आठवीचा विद्यार्थी आदित्य संदीप दौंगे याने नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा क्रीडा संकुल वाडिया पार्क अहमदनगर, येथे अहमदनगर जिल्हा तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित सब जुनियर कॅडेट गटातील फाईट व पुमसे या प्रकारात जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत 14 वर्षे वयोगटाखालील 28 ते 32 किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक मिळवत रौप्य पदक पटकावले आहे. त्याच्या या यशामुळे रेनबो स्कूलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्याला क्रीडा शिक्षक मास्टर विकास सावंत यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
आदित्यच्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन मा. कांतीलालजी अग्रवाल, सचिव मा. संजयजी नागरे सर, कार्यकारी संचालक मा. आकाशजी नागरे, मा. मनोजजी अग्रवाल सर, मा. आनंदजी दगडे सर, शैक्षणिक संचालक मा. नानासाहेब दवंगे सर, उपप्राचार्य श्री निलेश औताडे सर, प्रशासन प्रमुख श्री रवींद्र साबळे सर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
