जनतेचा विश्वास, विकासाचा निर्धार
वैशाली विजय वाजे यांना प्रभाग ५ मध्ये प्रचंड पाठिंबा”
माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे यांच्या कार्याचा वारसा पुढे नेत वैशाली वाजे यांची लोकप्रियता चढत्या क्रमात
कोपरगाव प्रतिनिधी मनिष जाधव – : नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीची रणधुमाळी सुरू होताच प्रभाग क्रमांक ५ मध्ये राजकीय समीकरणांमध्ये चांगलीच चुरस दिसू लागली आहे. या प्रभागात माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे यांच्या पत्नी वैशाली विजय वाजे यांना नागरिकांचा वाढता पाठिंबा लाभत असून, त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सध्या स्थानिक राजकारणात रंगली आहे.

माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे व वैशाली वाजे हे गेल्या काही वर्षांपासून सामाजिक आणि महिला सक्षमीकरणाच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय असून, परिसरातील महिलांसाठी स्वावलंबन शिबिरे, आरोग्य तपासणी उपक्रम, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहाय्य आणि परिसर स्वच्छता मोहिमा यामुळे त्यांनी नागरिकांमध्ये एक विश्वासार्ह आणि समर्पित व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख निर्माण केली आहे.
माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे यांनी आपल्या कार्यकाळात प्रभागात केलेल्या विकासकामांचा ठसा आजही नागरिकांच्या मनात आहे. त्याच कार्यशैलीचा वारसा वैशाली वाजे या पुढे नेत आहेत. सौम्य स्वभाव, लोकसंपर्काची हातोटी आणि विकासाभिमुख दृष्टिकोन या गुणांमुळे त्यांना सर्व स्तरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
प्रभागातील महिलांपासून ते युवकांपर्यंत सर्वत्र “वाजे ताई आमच्या सोबत आहेत” अशी भावना दिसून येते. स्थानिक नागरिकांनी सांगितले की, “वैशालीताई तसेच विजय वाजे यांनी नेहमीच लोकांच्या अडचणी समजून घेतात आणि त्वरित उपाययोजना करतात. त्या केवळ आश्वासने देत नाहीत, तर प्रत्यक्ष कृती करतात,” अशी प्रतिक्रिया रहिवाशांकडून मिळाली.
आगामी काळात प्रभाग क्रमांक ५ मध्ये विकासकामांना गती देणे, पाणीपुरवठा, रस्ते, प्रकाश व्यवस्था आणि जल निस्सारण यांसारख्या मूलभूत सोयी-सुविधांचे नियोजन करणे तसेच नागरिकांच्या सहभागातून प्रभाग सुशोभित करणे हे वैशाली वाजे यांचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
वैशाली विजय वाजे या प्रभाग क्रमांक ५ मधील एक मजबूत, लोकप्रिय आणि अनुभवसंपन्न दावेदार म्हणून उदयास येत असून, नागरिकांकडून मिळणारा वाढता पाठिंबा पाहता त्या या निवडणुकीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील, अशी चिन्हे दिसत आहेत.














