खऱ्या अर्थाने कोपरगाव शहराच्या विकासाला नवी दिशा मिळाली – रेणुका कोल्हे
सुख शांती नगर येथे संरक्षण भिंतीचे भूमिपूजन उत्साहात
कोपरगाव प्रतिनिधी – कोपरगाव शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले असून सुख शांती नगर येथील ओपन स्पेस संरक्षण भिंतीच्या बांधकामाचा शुभारंभ उत्साहात पार पडला. कोपरगाव नगरपरिषद अंतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोथान जिल्हास्तरीय योजनेतून प्रभाग क्रमांक २ मधील या कामासाठी सुमारे २२ लाख ८ हजार २५४ रुपये इतका अंदाजित निधी मंजूर करण्यात आला आहे.या कामाचे भूमिपूजन सौ. रेणुका विवेक कोल्हे यांच्या शुभहस्ते नगराध्यक्ष पराग संधान यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.

यावेळी उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशुर, गटनेते प्रसाद आढाव, बांधकाम सभापती निलोफर पठाण यांच्यासह संतोष शिंदे, दीपक जपे, कैलास मंजूळ, फिरोज पठाण, निसार शेख, राहुल खरात, वैभव गिरमे, मयूर गायकवाड, प्रतीक पगारे, गुर्मीत सिंग डडीयाल, रोशन शेजवळ, कैलास सोमासे, निलेश डोखे, सतीश खरात, सचिन त्रिभुवन, चेतन आगळे, अमर नरोडे, प्रशांत कोपरे, साहेबराव कोपरे, सुनील ढवळे, पल्लवी दडीयाल, स्वातीताई जपे, अनिता गाडे, दीपा गिरमे, रेणुका ताई नरोडे, दारूनकर ताई, अॅडव्होकेट झोडगे यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना सौ. रेणुका कोल्हे यांनी सांगितले की, कोपरगाव शहराच्या प्रगतीची खरी गती अशा विकासकामांतूनच दिसते आहे. या ठिकाणी होत असलेल्या कामाचा शुभारंभ सर्व नागरिकांच्या सहभागातून झाला असून, हे काम वेळेत आणि दर्जेदार पूर्ण व्हावे यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे.युवानेते विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वात नगराध्यक्ष पराग संधान आणि नगरसेवक पदाधिकाऱ्यांकडून कृतीयुक्त विकासाची घोडदौड वेगाने सुरू झाली आहे.काही दिवसांपासून शहरात स्वच्छता,पाणी यात सकारात्मक बदल दिसून येतो आहे.
या संरक्षण भिंतीमुळे ओपन स्पेस सुरक्षित राहून भविष्यात विविध सामाजिक, सांस्कृतिक व सार्वजनिक उपक्रमांसाठी नागरिकांना सुयोग्य आणि संरक्षित सुविधा उपलब्ध होणार आहेत. शहराच्या नियोजनबद्ध विकासाच्या दृष्टीने हे काम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.नागरिकांना अपेक्षित असणारे काम सुरू आहे त्यामुळे शहराच्या विकासाला खऱ्या अर्थाने गती मिळाली आहे अशी भावना कोल्हे यांनी व्यक्त केली आहे.
नगराध्यक्ष पराग संधान म्हणाले जनतेला आम्ही दिलेली आश्वासने कृतीतून पूर्ण करण्यासाठी सर्वजण काम करतो आहोत.सर्वसामान्य नागरिक हे विविध क्षेत्रातील सकारात्मक बदल अनुभवत आहे त्यामुळे काम करतांना आमची प्रेरणादायी भावना आहे.













