आपला जिल्हा

कोपरगाव येथे शिवसेना उ.बा.ठा. च्या भगवा सप्ताहास प्रारंभ – सनी वाघ 

संपादक मनिष जाधव 9823752964

कोपरगाव येथे शिवसेना उ.बा.ठा. च्या भगवा सप्ताहास प्रारंभ – सनी वाघ 
कोपरगाव प्रतिनिधी मनिष जाधव – आज कोपरगाव येथे विघ्नेश्वर चौकात शिवसेना कोपरगाव शहर व ग्रामीणच्या वतीने भगवा सप्ताहास प्रारंभ करण्यात आले व नुतन सभासद नोंदणीस खासदार श्री. भाऊसाहेब वाकचौरे व जिल्हाप्रमुख श्री. रावसाहेब नाना खेवरे सहसंपर्क प्रमुख मा. राजाभाऊ झावरे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी कोपरगाव शहर व ग्रामीण शिवसेनेच्या वतीने जास्तीत जास्त शिवसेना सभासद नोंदणी करण्याचा संकल्प करण्यात आला.
झ
याप्रसंगी श्री. भाऊसाहेब वाकचौरे साहेब व जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे नाना यांनी कोपरगाव मतदार संघात शिवसेनेची उ.बा. ठा. गटाची ताकद असल्याने हा मतदार संघ महाविकास अघाडीत शिवसेनाच लढेल तसा ठाम विश्वास व्यक्त केला. तसेच शिवसेनेने प्रत्येक सभासदाचा दोन लाख रूपयांपर्यंतचा विमा उतरवणार असुन आमचा शिवसैनिक ग्रामीण भागातील सामान्य जनतेचे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांच्या प्रश्नासाठी सातत्याने लढणार शिवसैनिक असुन शिवसेनाप्रमुखांचे विचार तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन केले.
झ
सदरप्रसंगी शिवसेना जिल्हासंघटक श्री. प्रमोदअण्णा लबडे, उपजिल्हाप्रमुख श्रीरंग चांदगुडे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख सौ. सपनाताई मोरे, मा. तालुकाप्रमुख श्री. शिवाजी ठाकरे, शहरप्रमुख सनी वाघ, कलविंदरसिंग डडीयाल, विधानसभा संघटक अस्लमभाई शेख, नगरसेवक कालुआप्पा आव्हाड, श्री. भरत मोरे, श्री. मुन्ना मन्सुरी, श्री. रवीनाना कथले, शेखर कोलते, गणेश जाधव, संजय दंडवते, साहेबराव कंक्राळे, राजेंद्र नाजगड, रंगनाथ गव्हाणे, विवेक कुलकर्णी, कृष्णा आहेर, शैलेश खालकर, विजय गोर्डे, बाळासाहेब वाकळे, रंजनमामा जाधव, अनिरूद्ध जगदाळे, चेतन मोरे, आशिष निकुंभ, मनोज कपोते, अरूण बोराडे, नगरसेवक अतुल काले, नितीश बोरूडे, सिद्धार्थ शेळके, प्रमोद पंडोरे, संदिप देवरे, शुभम आढाव, सचिन आढाव, मधु पवार, इरफानभाई शेख, बाळासाहेब साळुंके, बालाजी गोर्डे, गणेश जाधव, अल्ताफभाई शेख, वसिम पटेल, माधव आहेर, किरण पहिलवान, राजु हारणे, श्रीकांत बागल, महेश गायकवाड, नितीन घुगे, तुषार आढाव, किरण आव्हाड आदि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!