आपला जिल्हा

कोपरगावात संस्कृत संभाषण शिबिर उत्साहात संपन्न…

मनिष जाधव 9823752964

कोपरगावात संस्कृत संभाषण शिबिर उत्साहात संपन्न…

कोपरगाव येथील विद्याप्रबोधिनी (शिशु विकास मंदिर) या शाळेत १ जुलै ते १० जुलै दरम्यान संस्कृत संभाषण मोफत शिबिर अत्यंत उत्साहात संपन्न झाले.

कोपरगांव येथे प्रथमच संस्कृतभारती मार्फत सदर शिबिर आयोजित करण्यात आले होते.शिबिराचा समारोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. प्रारंभी भारतमाता पुजन करण्यात येऊन ध्येयमंत्राचे गायन करण्यात आले.

पु

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन तालुका संघचालक सुरेशराव विसपुते, तालुका कार्यवाह निलेश जाधव, संस्कृतभारतीचे कल्पेश येवला हे उपस्थित होते.

संस्कृत शिबिर शिक्षक मयुर कुलकर्णी यांनी संस्कृत शिक्षणाची आवश्यकता स्पष्ट करुन दर महिन्यात एक संभाषण शिबिर आयोजित करण्याचा मानस उपस्थितांसमोर व्यक्त केला. उपस्थित सर्वांनीच सदर प्रस्तावास अनुमोदन दिले. सदर शिबिरातील सहशिक्षिका अनिता माळी यांनी पत्रद्वारा संस्कृत शिक्षण, गीतासोपान आणि बालकेंद्र या वर्गांबद्दल उपस्थितांना माहिती दिली. या प्रसंगी तालुका संघचालक सुरेशराव विसपुते,तालुका कार्यवाह निलेश जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.शिबिरात सहभागी मध्ये प्रातिनिधिक स्वरुपात भक्ती काले,वृषाली कुलकर्णी, स्मिता पोळ, दगु दरेकर यांचे सह वर्गातील विद्यार्थ्यांनी संस्कृतमधुन आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका अनिता माळी यांनी केले तर आभार स्वच्छतादूत सुशांत घोडके यांनी मानले. एकात्मता मंत्राने कार्यक्रमाचा समारोप झाला.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!