कोपरगावच्या प्रगतीला नवी दिशा
पराग बॅन्क्वेट्स हॉल व मंजुळा शॉपिंग कॉम्प्लेक्सचे भव्य उद्घाटन
शिर्डी–लासलगाव रोड, अंबिकानगर, सुरेगाव (ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर) येथे उभारण्यात आलेला हा बॅन्क्वेट हॉल व शॉपिंग कॉम्प्लेक्स परिसरातील व्यापारी, उद्योजक तसेच नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण सुविधा ठरणार आहे.
कोपरगाव प्रतिनिधी मनिष जाधव – व्यावसायिकतेसह सुविधा, सौंदर्य आणि आधुनिकतेचा सुरेख संगम असलेल्या पराग बॅन्क्वेट्स हॉल व मंजुळा शॉपिंग कॉम्प्लेक्स या भव्य वास्तूचा उद्घाटन सोहळा सोमवार दि. 26 जानेवारी 2026 रोजी दुपारी ठीक 3 वाजता मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे तरी नागरिकांनी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन पराग उद्योग समूहाच्या वतीने सौ. वत्सलाबाई व श्री. पुंजाजी चिमाजी पा. राऊत व समस्त राऊत पा. व पराग परिवार यांनी केले आहे.

या शुभप्रसंगी प.पू. महंत रमेशगिरीजी महाराज (राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज आश्रम, कोपरगाव बेट) व प.पू. महंत गोवर्धनगिरीजी महाराज (सिद्धेश्वर देवस्थान, सुरेगाव , माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे साहेब, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांचे मंगल आशीर्वाद लाभणार आहे. या सोहळ्याचे अध्यक्षपद मा. सौ. स्नेहलताताई बिपिनदादा कोल्हे, प्रथम महिला आमदार, कोपरगाव विधानसभा, भूषविणार आहेत. उद्घाटन मा. अॅड. श्री. रविकाका बोरावके चेअरमन ज्योती सहकारी पतसंस्था तसेच सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे.

या उद्घाटन सोहळ्यास छत्रपती संभाजी नगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार संदीपानजी भुमरे, नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ वाजे, माजी सदस्य जिल्हा परिषद नाशिक अमृताताई पवार, कोपरगाव नगरपरिषद लोकनियुक्त नगराध्यक्ष पराग संधान, अविष्कार दादाजी भुसे युवासेना विस्तारक मालेगाव, डॉ. मैथिली सत्यजित तांबे संगमनेर नगरपरिषद लोकनिक्त नगराध्यक्षा, संदीप वर्पे प्रदेश प्रवक्ता शरद पवार गट, संदीपकुमार कोळी पोलीस निरीक्षक कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन, महेश सावंत कोपरगाव तहसीलदार, छायाताई गुलाबराव शेवाळे शहर प्रमुख शिवसेना महिला आघाडी मालेगाव यांच्यासह खासदार, आमदार, नगरसेवक, सामाजिक, सहकार, राजकीय तसेच प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी, अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.














