आपला जिल्हामहाराष्ट्र

कोपरगावच्या ‘एक्स्पो-२०२६’ मध्ये ‘संस्कृती पापड’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

मनिष जाधव 9823752964

कोपरगावच्या ‘एक्स्पो-२०२६’ मध्ये ‘संस्कृती पापड’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
कोपरगाव प्रतिनिधी मनिष जाधव – महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट, कोपरगाव येथे लायन्स क्लब ऑफ कोपरगाव, लिनेस क्लब ऑफ कोपरगाव, लिओ क्लब ऑफ कोपरगाव व क्रेडाई कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आणि कर्मवीर शंकरराव काळे उद्योगसमूह यांच्या प्रायोजकत्वाखाली आयोजित ‘एक्स्पो-२०२६’ प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. विविध उद्योग, गृहउपयोगी साहित्य, खाद्यपदार्थ आणि स्थानिक उद्योजकांनी सजवलेल्या स्टॉल्समुळे प्रदर्शन परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ऊ
कावेरी विशाल राऊत
एऊ
Oplus_16908288
यंदाच्या प्रदर्शनात ‘संस्कृती पापड’च्या स्टॉलला विशेष आकर्षण ठरले. दर्जेदार चव, घरगुती पद्धतीने तयार केलेले विविध प्रकारचे पापड आणि किफायतशीर दर यामुळे अनेक नागरिकांनी या स्टॉलला भेट देत खरेदी केली. महिलावर्ग आणि तरुणांनीही मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली.
‘संस्कृती पापड’च्या संस्थापक-संचालक सौ. कावेरी विशाल राऊत यांनी स्थानिक पातळीवर सुरू केलेला हा उद्योग आज गुणवत्तेच्या बळावर वेगाने प्रगती करत आहे. स्वच्छता, पारंपरिक चव आणि ग्राहकांचा विश्वास हीच आपल्या यशाची गुरुकिल्ली असल्याचे त्यांनी सांगितले. प्रदर्शनाच्या निमित्ताने नव्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले.
विशाल राऊत
Oplus_16908288
‘एक्स्पो-२०२६’मधील विविध स्टॉल्सना भेट देण्यासाठी नागरिकांची संध्याकाळी विशेष गर्दी होत असून, स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन देणारा हा उपक्रम ठरत आहे. ‘संस्कृती पापड’च्या स्टॉलवरील वाढती गर्दी ही स्थानिक उत्पादनांवरील विश्वासाची पावती असल्याचे चित्र प्रदर्शनात पाहायला मिळत आहे.
प्रतिक्रिया –
सौ.डॉ. काजल गलांडे कोपरगाव:
संस्कृती पापडची चव अगदी घरगुती आणि पारंपरिक आहे. कुरकुरीतपणा आणि मसाल्याचा समतोल खूप छान वाटला. आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे पापड घेतले असून, पुढेही नक्की खरेदी करू.
श्री. नितीन डोंगरे (व्यावसायिक):
स्थानिक महिलांनी उभा केलेला हा उद्योग पाहून अभिमान वाटतो. दर्जा आणि पॅकिंग उत्तम आहे. अशा प्रदर्शनांमुळे छोट्या उद्योजकांना मोठी संधी मिळते, हे ‘संस्कृती पापड’च्या स्टॉलवरून स्पष्ट दिसते.
श्रीमती छाया दिपक कुदळे (गृहणी) :
“मी पहिल्यांदाच ‘संस्कृती पापड’चा स्वाद घेतला आणि खूप आवडला. वेगवेगळ्या फ्लेवर्समुळे आकर्षण वाटते. आमच्या घरी आता हेच पापड असणार
श्री. संदीप राहणे पा. (नाशिक शिक्षक) :
संस्कृती पापडची गुणवत्ता खरोखरच कौतुकास्पद आहे. चव, कुरकुरीतपणा आणि स्वच्छ पॅकिंग पाहून समाधान वाटले. स्थानिक उद्योगांना अशा प्रदर्शनातून नक्कीच नवी दिशा मिळते.
सौ. रेखा गायकवाड  (उद्योजिका येवला ) 
घरगुती पद्धतीने तयार केलेल्या उत्पादनांची चव वेगळीच असते, हे ‘संस्कृती पापड’ने सिद्ध केले आहे. किफायतशीर दर आणि विविध प्रकारांमुळे ग्राहकांना चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे.
श्री. प्रविण गायके  (शिक्षक) :
स्थानिक ब्रँड म्हणून ‘संस्कृती पापड’ने प्रभावी उपस्थिती दाखवली आहे. ग्राहकांशी संवाद आणि उत्पादनाविषयी माहिती देण्याची पद्धत आवडली. भविष्यात हा ब्रँड आणखी मोठा होईल, यात शंका नाही.
मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!