आपला जिल्हा

काँग्रेस नेते आ.थोरात यांच्या पाठपुराव्यातून तालुक्यात विविध विकास कामांसाठी 6 कोटी 80 लाख रुपयांचा निधी

संपादक मनीष जाधव ९८२३७५२९६४

काँग्रेस नेते आ.थोरात यांच्या पाठपुराव्यातून तालुक्यात विविध विकास कामांसाठी 6 कोटी 80 लाख रुपयांचा निधी

संगमनेर प्रतिनिधी – काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये निळवंडे कालव्यांसह तालुक्याच्या विकास कामांसाठी मोठा निधी मिळवला होता. मागील वर्षीही अंगणवाडी, प्राथमिक शाळा खोल्या विविध रस्ते यांसह विविध विकास कामांच्या केलेल्या मागणीतून व पाठपुराव्यातून जिल्हा विकास नियोजन मधून या कामांना 6 कोटी 80 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती इंद्रजीतभाऊ थोरात यांनी दिली आहे.

संगमनेरातील आ. बाळासाहेब थोरात

याबाबत अधिक माहिती देताना इंद्रजीत भाऊ थोरात म्हणाले की, सातत्याने विकासातून वाटचाल करणाऱ्या संगमनेर तालुक्याच्या प्रत्येक गावासाठी आमदार थोरात यांनी मोठा निधी मिळवला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या निळवंडे धरणाच्या कालव्यासाठी मोठा निधी मिळून हे कामे रात्रंदिवस सुरू ठेवली होती. याचबरोबर तालुक्यातील रस्ते, अंगणवाडी, प्राथमिक शाळा खोल्या व विविध विकास कामांसाठी ही मोठा निधी मागणी केली होती. मात्र सत्ता बदल झाला आणि अनेक विकास कामांना स्थगिती मिळाली होती.

स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी सुचवलेल्या व पाठपुरावा केलेल्या विविध विकास कामांना जिल्हा नियोजन समितीने मंजुरी दिली असून या अंतर्गत संगमनेर तालुक्यातील अंगणवाडी 4 खोल्यांसाठी 45 लाख रुपये, जनसुविधा योजनेअंतर्गत पेविंग ब्लॉक बसवणे, दशक्रिया विधी घाटाचे सुशोभीकरण ,पिण्याच्या पाण्याचे फिल्टर बसवणे, सोलर लॅम्प बसवणे व इतर सुशोभीकरण कामासाठी 56 लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. तर प्राथमिक शाळेच्या 8 खोल्यांसाठी 1 कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. याचबरोबर नागरी सुविधांमधून चंदनापुरी येथील साईबाबा मंदिर परिसर स्वच्छतागृह अनुग्रह बांधण्यासाठी 12 लाख रुपये व साकुर येथील सार्वजनिक ठिकाणी दिवाबत्ती करण्यासाठी 7 लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. याचबरोबर क वर्ग तीर्थक्षेत्रांकरता 1 कोटी 5 लाख रुपये आणि संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरण व डांबरीकरण कामांसाठी 3 कोटी 10 लाख रुपयांचा निधी असे एकूण 6 कोटी 80 लाख रुपयांचा निधी मिळाला आहे.

विविध गावांमध्ये होणाऱ्या या विकास कामांच्या निधी करता आमदार बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून त्यांच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध झाला आहे. यामध्ये कवठे धांदरफळ, वेल्हाळे, पिंपळगाव माथा ,निळवंडे येथे अंगणवाडी खोल्या उभारण्यात येणार आहेत. तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या खोल्या जांभुळवाडी,तळेगाव, शेळकेवाडी,कसबावाडी, पोखरी हवेली, साकुर आणि राजापूर येथे बांधण्यात येणार आहे. याचबरोबर जनसुविधा योजनेअंतर्गत मेंगाळवाडी, निमगाव खुर्द, सावरगाव तळ, निमोन, निळवंडे, चिंचोली गुरव, आंबी खालसा,सावरगाव घुले, पोखरी बाळेश्वर, जवळे बाळेश्वर, वडगाव लांडगा,चिकणी, गुंजाळवाडी,वेल्हाळे,कासार दुमाला, डोळासने, खंडेरायवाडी, या ठिकाणी सुशोभीकरण करण्यात येणार आहे. रस्ते डांबरीकरण व मजबुतीकरणासह विविध कामांचा समावेश असलेली ही कामे लवकरात लवकर सुरू होणार असल्याची माहिती इंद्रजीत भाऊ थोरात यांनी दिली आहे. आमदार बाळासाहेब थोरात यांनी पाठपुरावा केलेली कामे लवकर सुरू होणार असल्याने संगमनेर तालुक्यातील विविध गावांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!