एच .एस .सी. बोर्ड परीक्षेसाठी सह्याद्री ज्युनिअर कॉलेज केंद्र क्रमांक 0232 मध्ये विद्यार्थी बैठक व्यवस्था
संगमनेर – पुणे विभागाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या एच. एस. सी. बोर्ड परीक्षेच्या केंद्र क्रमांक 0232 ला प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री ज्युनिअर कॉलेजमध्ये करण्यात आल्याची माहिती केंद्र संचालक तथा उपप्राचार्य श्री एस. पी. सुरसे सर यांनी दिली. एच .एस .सी. बोर्ड परीक्षेचे केंद्र क्रमांक 0232 मध्ये प्रविष्ट होणाऱ्या इयत्ता बारावी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी मंगळवार दिनांक 11 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या सर्व पेपरची बैठक व्यवस्था भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री ज्युनिअर कॉलेज संगमनेर येथे करण्यात आलेली आहे याची संबंधित विद्यार्थी व पालकांनी नोंद घ्यावी. तसेच केंद्र क्रमांक 0232 मध्ये प्रविष्ट होणाऱ्या इयत्ता बारावी कला व वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी मंगळवार दिनांक 11/02/2025 रोजी होणाऱ्या इंग्रजी विषयाची बैठक व्यवस्था भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री विद्यालय संगमनेर येथे करण्यात आलेली आहे. मात्र बुधवार दिनांक 12/02/2025 पासून च्या सर्व पेपरची बैठक व्यवस्था भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री ज्युनिअर कॉलेज संगमनेर येथे करण्यात आलेली आहे. सर्व परीक्षार्थींनी पुढील बाबींचे पालन करणे आवश्यक आहे.
1) पेपरला येताना आपल्या सोबत पारदर्शक पाण्याची बॉटल आणावी. 2) परीक्षा कक्षामध्ये भ्रमणध्वनी इलेक्ट्रॉनिक घड्याळ गणक यंत्र व तत्सम इलेक्ट्रॉनिक साधने किंवा उपकरणे बाळगण्यास सक्त मनाई आहे.
3)सर्व परीक्षार्थींनी परीक्षा दालनात परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी उपस्थित राहावे .
एच. एस .सी. बोर्ड परीक्षा करीता प्रविष्ट होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना प्राचार्य श्री के .जी. खेमनर सर ,केंद्र संचालक तथा उपप्राचार्य श्री. एस .पी. सुरसे सर आणि प्राध्यापक वृंद यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.